सांगोला (प्रतिनिधी):- वासुद-मिरज रेल्वे लाईन वरील वासुद ते सूतगिरणी (मिरज रोड) जोडणार्या रेल्वे भुयारी मार्गाचा रस्ता खराब असल्याने येथील नागरिकांचे खूप हाल होत होते. याबाबत येथील नागरिकांनी हा रस्ता तत्काळ दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी होत होती. याबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केल्याने या मागणीला यश आले असून शुक्रवार दि.4 एप्रिल पासून काँक्रीटीकरणच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होत आहे.
सांगोला – मिरज रेल्वे मार्गावरील वासुद येथील रेल्वे गेट क्रमांक 33. कि.मी. 373/7 – 8 येथील भुयारी मार्ग (वासुद ते सूतगिरणी) मिरज रोड पर्यंतचा हा खराब झाला असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांचे अतोनात हाल होत होते. शेतकरी, शाळकरी विद्यार्थी यांचेसह मृत व्यक्तीस स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी किंवा अतिदक्षता विभागात रुग्णांना घेऊन जाण्यात या रस्त्याच्या परिस्थितीमुळे त्रास सहन करावा लागत होता.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यासंबधी रेल्वे प्रबंधक मध्या रेल्वे यांचेकडे पाठपुरावा केला. त्यानुसार 4 एप्रिल पासून रस्ता काँक्रीटिकरणाच्या कमाल प्रत्यक्ष सुरवात होत आहे. यासाठी रेल्वे विभागाकडून वासुद ग्रामपंचायतीस रस्त्याचे काम संपेपर्यंत (45 दिवस) सदरचा रस्ता बंद ठेवून या रस्त्यावरून दरम्यानच्या काळात वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा
सप्तम सोशल फाउंडेशन आयोजित शाळा पालकत्व कार्यक्रम संपन्न