टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

तरुणांमध्ये वाढतोय मणक्याच्या दुखापतींचा धोका ; जीवनशैलीत योग्य बदल करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Follow Us:

मणक्याच्या (स्पायनल कॉर्ड) दुखापती या लहानांपासून थोरामोठ्या पर्यंत कोणत्याही वयोगटात आढळून येऊ शकतात. या दुखापतीमुळे पाठदुखी, हात किंवा पायांमध्ये कमजोरी, अंग सुन्न पडणे, हाता-पायांमधील अशक्तपणा (पक्षाघात) तसेच लघवी-शौचास नियंत्रण राखण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मणक्याच्या दुखापती कशा टाळता येतील याची माहिती डॉ. तुषार राठोड ऑर्थोपेडिक व स्पाईन सर्जन यांनी दिली आहे.

तरुणांमध्ये वाढतोय मणक्याच्या दुखापतींचा धोका ; जीवनशैलीत योग्य बदल करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

आपल्या पाठीचा कणा हा आपल्याला सरळ उभं राहायला आणि योग्य शारीरीक हालचालींकरिता मदत करतो. या पाठीच्या कण्याच्या आत असलेली स्पायनल कॉर्ड मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये संदेश पोहोचविण्याचे काम करते. हात-पाय हलवणे, वेदना जाणवणे, श्वास घेणे तसेच लघवी-मलविसर्जन यांसारख्या क्रिया स्पायनल कॉर्डमुळे शक्य होतात. यातील काही क्रिया आपल्या नियंत्रणात असतात, तर काही आपोआप होतात. स्पायनल कॉर्डला इजा झाली तर त्याचा परिणाम काही वेळापुरता किंवा कायमस्वरूपीही देखील होऊ शकतो.

मणक्याच्या दुखापतीमुळे लाखो लोक त्रस्त आहेत. आजकाल पाठदुखी ही दीर्घकाळ कामावर गैरहजर राहण्याचे आणि अपंगत्वाचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. एकाच जागी जास्त वेळ बसून काम करणे, बसण्याची चुकीची पद्धत, व्यायामाचा अभाव तसेच सततचा प्रवास किंवा कामाच्या सवयी यामुळे अगदी तरुण वयातही मणक्यावर अतिरिक्त ताण येतो.याशिवाय सकाळचे कोवळे ऊन न मिळ्ल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता हे पाठदुखीचं एक महत्त्वाचं कारण ठरत आहे.

मणक्याच्या दुखापती कशामुळे होतात?

* रस्त्यावरील अपघात

* उंचावरून खाली पडणे

* खेळताना झालेल्या दुखापती

* हिंसाचारामुळे होणारी दुखापत

* टीबी सारखे संसर्ग, गाठी (ट्यूमर)

* वयामुळे होणारी पाठीच्या कण्याची झीज

या दुखापती सौम्य कमजोरीपासून ते पक्षाघाताइतपत या गंभीर असू शकतात.

मणक्याच्या दुखापतींचा धोका कसा कमी कराल?

वाहन चालवताना न विसरता सीट बेल्ट लावणे, मोबाईल  फोनचा वापर न करणे आणि दारू पिऊन वाहन न चालवणे या चांगल्या सवयींमुळे मणक्याच्या दुखापती टाळता येतात. त्याचबरोबर घसरुन पडण्यासारखे किरकोळ अपघात टाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. घरात रेलिंग बसवणे, रात्रीच्या वेळी घरात योग्य प्रकाश पडेल अशी सुविधा असणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे, वजन नियंत्रित राखणे, भरपूर पाणी पिणे आणि न घसरणारी पादत्राणे वापरणे गरजेचे आहे.

खेळाडूंनी विशेष काळजी घेत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा साधने वापरणे आवश्यक आहे.पाठदुखी, हात-पाय सुन्न होणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास  त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वमर्जीने औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.

मणका निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?

मणक्याची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे सेवन अतिशय गरजेचे आहे. अतिव्यायाम करणे टाळा कारण यामुळेही मणक्याची झीज होऊ शकते.चालणे, पोहणे, सायकल चालवणे, स्ट्रेचिंग आणि योगासनांमुळे मणक्याला आधार देणारे स्नायू मजबूत होतात.कामाच्या ठिकाणी आणि घरी बसताना योग्य शारीरीक स्थिती राखणे, वजन उचलताना पाठ सरळ ठेवणे आणि वजन नियंत्रित राखणे गरजेचे आहे. यामुळे मणक्यावर ताण कमी होतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य