बुधवार दि.12 मार्च 2025
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींसह दादाराव केचे, अमरनाथ राजूरकरांचं नाव दिल्लीला पाठवलं, पाच जागांसाठी 27 मार्च रोजी होणार निवडणूक
-
एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना सुरु केलेली आनंदाचा शिधा योजना अखेर बंद
-
लाडकी बहीण योजनेच्या 50 लाख महिला लाभार्थी घटणार, भास्कर जाधवांचा सभागृहात दावा, अर्थसंकल्पात 10 हजार कोटीचा निधी कपात केल्याचा दाखला
-
अजित पवारांनी भाजपच्या मंत्र्यांसाठी हात सैल सोडला, शिंदे गट निधीवाटपात शेवटच्या स्थानी, 57 आमदार असलेल्या शिंदे गटाला 41 हजार कोटी तर 41 आमदार असलेल्या राष्ट्रवादीला 56 हजार कोटींचा निधी, भाजपला सर्वाधिक 89 हजार कोटींचा निधी
-
मी फक्त 10 ते 12 कोटी खर्चून निवडणूक जिंकलो, राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंची जाहीर कबुली, अडचणीत आल्यानंतर ते वक्तव्य विनोदाने केल्याची सारवासारव
-
प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी, सुनावणीसाठी कोरटकराला कोल्हापूर कोर्टात हजर राहायचं की नाही यावर कोर्ट देणार निर्णय
-
पाकिस्तानात प्रवासी ट्रेनचे अपहरण: बलुच आर्मीचा दावा- 182 प्रवाशांना ओलीस ठेवले, 11 सैनिक ठार; म्हणाले- कारवाई केली तर ओलिसांनाही मारू
-
प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर होणार कारवाई: मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निर्गमित केल्या सूचना; आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कारवाई
-
सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक: दिल्लीतील लाडक्या बहिणींना 2500, मग महाराष्ट्रातील बहिणींना 1500 का? आदित्य ठाकरेंचा सवाल
-
धनंजय मुंडेंवर कुटुंबातील कोणीही नाराज नाही: आमच्या कुटुंबाची बदनामी सुरू आहे, सुरेश धसांचे आरोप बिनबुडाचे – अजय मुंडे
-
विधानसभा कामकाज: गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर, दारुदुकान सुरू करण्यासाठी NOC आवश्यक -अर्थमंत्री पवार
-
सरकारने गोड बोलून जनतेची मान कापली: मनोज जरांगे यांची अर्थसंकल्पावरून सरकारवर टीका; पुन्हा मुंबईला जाण्याचा इशारा
-
राज्यसभेत खरगेंच्या ‘ठोकेंगे’च्या वक्तव्यावरून गोंधळ: उपसभापतींनी बोलण्यापासून रोखले तेव्हा म्हणाले- काय-काय ठोकायचे, ते आम्ही व्यवस्थित ठोकू
-
ICC च्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात रोहितचे नाव नाही: मिचेल सँटनर कर्णधार; कोहलीसह भारतातील 5 खेळाडूंचा समावेश