Ravindra Dhangekar on Murlidhar Mohol : पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांनी जाब विचारला. तर दुसरीकडे रवींद्र धंगेकरांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कारवाईसाठी साकडं घातलं आहे.
Pune News : पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्रीप्रकरणात आता वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना काल जैन बांधवांनी जाब विचारला तर जैन मुनींनी आयोजित केलेल्या बैठकीला ते हजर राहिले. त्यांनी यावेळी आपल्या याप्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नसल्याची बाजू मांडली. दरम्यान शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कारवाईसाठी साकडं घातलं आहे. त्यांनी मोहोळांविरोधात पत्र लिहिलं आहे. काय आहे पत्रात मागणी?
काल काय घडल्या घडामोडी?
जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहार वादानंतर जैन मुनी श्री गुप्ती नंदीडी महाराजांनी एक बैठक घेतली. त्यात मुरलीधर मोहोळ यांनी सहभाग घेतला. ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन बसले. त्यानंतर त्यांनी जैन मुनींसमोर नारळ ठेवला आणि आशीर्वाद मागितला. जैन मुनींनी त्यांना नारळ देत आशीर्वाद दिले. काल जैन बांधवांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना घेराव घातला. जैन बोर्डिंग जमीन वादाबाबत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यावेळी मोहोळ यांनी आपला या प्रकरणात काहीही संबंध नसल्याची बाजू मांडली.
व्यवहार रद्द करा
जैन मुनी यांनी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी रेटली. जर याविषयी सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर 1 नोव्हेंबरपासून उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता याप्रकरणात मोठे आंदोलन उभे राहिल्याचे समोर येत आहे. रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा उद्यापासून धरणं आंदोलनाची घोषणा केली आहे. एकूणच जमीन व्यवहार प्रकरण तापल्याचे दिसून येते.
जैन बोर्डिंग मुक्त होईपर्यंत वेड जाणार नाही
मला बरं होण्यासाठी जैन मंदिर सुटका करणे हाच एकमेव उपचार आहे. गहाण ठेवलेलं ते सन्मानाने समाजाला देणं. तोपर्यंत माझं डोकं बरं होणार नाही मला वेड लागलं आहे..मुरलीधर मोहोळ जे बोलले आहे ते खात्रीने बोलले आहेत मला वेड लागलं आहे.जैन बोर्डिंग जोपर्यंत मुक्त करत नाही तोपर्यंत हे वेड असणार आहे. मला जर बरं व्हायचं असेल तर एकच उपाय आहे मंदिर लवकर सोडून द्या, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.
संबंधित बातम्या
त्यांची हतबलता बघून आले 18 दिवसांमध्ये जर हा निर्णय घेतला असता ही हतबलता त्यांची दिसून आली नसती. अठरा दिवसानंतर का जातात तर देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला बोलावलं जर योग्य निर्णय नाही घेतला तर तुझं राजकीय भवितव्य धोक्यात आहे. असं सक्त ताकीद त्यांनी दिली असेल, असा टोला धंगेकरांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांना सर्व कळतं. जोपर्यंत हे मंदिर मुक्त होत नाही तोपर्यंत मी वेडा झालेला आहे तोपर्यंत मी बराच होणार नाही. कमला नेहरू मधील नवरस पोरांवरती मी बोलत नाही. धर्मवीर धीरज घाटे वरती तर मी बोलत नाही.जागा कुणाची घेतली तर वक्फ बोर्डाची राग कुणाला आला तर धर्मवीरांना, असा चिमटा धंगेकरांनी काढला.
कमला नेहरू मधली जी नवरस बाळं आहेत जी पाळण्यातून घरी आणले आहेत. त्यांच्यावर मी बोलत नाही रवींद्र धंगेकर यांची गणेश बिडकर यांच्या वरती टीका केली. जैन बोर्डिंग या ठिकाणी मी धरणे आंदोलन करणार आहे तिथं मी एक दिवस बसणार आहे. एकनाथ शिंदे यांची मी माफी मागतो देवेंद्र फडणवीस यांची मी माफी मागतो मात्र मला जैन बोर्डींग मुक्त करून द्या. जैन मंदिर झालं तर दोघांनाही साष्टांग दंडवत घालतो असे धंगेकर म्हणाले.
मोदींना धंगेकरांचे पत्र
जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकर 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री-पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. जैन बोर्डिंगच्या जमिनीची पाहणी केली तेव्हा मोहोळ बिल्डरचे पार्टनर होते. मोहोळ केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ट्रस्टच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले तिन्ही कंपन्यांचे मालक मोहोळांचे निकटवर्तीय गोखले कन्स्ट्रक्शनने 230 कोटींना संबंधित जमीन विकत घेतल्याचा गंभीर आरोप रवींद्र धंगेकरांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात केला आहे.



