Pune Crime News: कोयत्याने वार केला अन् प्रेयसीचे शीर धडावेगळं! स्वतःच फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Pune Crime News: पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्यामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला, त्यानंतर चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार (Crime News) केल्यानं प्रेयसीचे शीर धडावेगळं झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातून आलेल्या प्रेमीयुगुलापैकी प्रेयसीने पैसे मागितल्याच्या रागातून प्रियकराने कोयत्यानं (Crime News) वार केला, त्यानंतर तिचे शीर धडावेगळे झाले. वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (दि. 19) ही घटना घडली आहे. सोनाली राजू जाधव (वय 28, रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. खून केल्यानंतर (Crime News) आरोपी सखाराम धोंडिबा वालकोळी (वय 58, रा. निडगुरसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) याने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

या घटनेबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील निकम यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार आरोपी सखाराम हा प्रेयसी सोनालीसोबत बुधवारी (दि. 19) सायंकाळी सातच्या सुमारास वांबोरी परिसरातील पिलेश्वर देवस्थान मंदिर परिसरात गेले होते. यावेळी प्रेयसी सोनाली आरोपी सखारामकडे पैशाची मागणी करू लागली. ‘मला पैसे दे नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन,’ असं ती म्हणात होती, त्यावरून सोनाली व सखाराम यांच्यात वाद झाला. त्यानंतर सखारामने सोनालीच्या मानेवर कोयत्यानं (Crime News) वार केला, यामध्ये तिचा मृत्यू झाला. कोयत्याचा वार इतका जोरात होता, त्यामुळे सोनालीचे शीर धडावेगळे झाले. त्यानंतर आरोपी सखाराम वार केलेला कोयता घेऊन जवळपास चार किलोमीटर अंतर चालत रात्री दहाच्या सुमारास वांबोरी पोलिस दूरक्षेत्रात पोहोचला. तेथे त्याने स्वतःच फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. ‘मी माझी प्रेयसी सोनालीला ठार मारले (Crime News) आहे,’ असं त्याने पोलिसांना सांगितलं.

फक्त पैशावरून वाद होता का?

पोलिसांनी सोनालीचा मृतदेह पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वांबोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे वांबोरी परिसरात खळबळ उडाली. बाहेरगावावरून आरोपी त्या ठिकाणी का आला होता? त्याने आपल्या प्रेयसीची हत्या (Crime News) नेमकी कोणत्या कारणावरून केली? फक्त पैशावरून वाद होता का? तो वांबोरीपर्यंत कोणत्या वाहनाने आला? याचा तपास पोलिस करत आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon