टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

PM Kisan Yojana: शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, पीएम किसान योजनेचे दोन हजार या दिवशी खात्यात, सरकारची मोठी घोषणा

Follow Us:

PM Kisan 22nd Installment: पीएम किसान योजनेचा 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा एकदाची संपली आहे. केंद्र सरकारने हा हप्ता या दिवशी जमा करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसानंतर हा हप्ता बँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे. काय आहे मोठी अपडेट?

PM Kisan Yojana: शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, पीएम किसान योजनेचे दोन हजार या दिवशी खात्यात, सरकारची मोठी घोषणा

PM Kisan 22nd Installment: पी एम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची (PM Kisan 22nd Installment) प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा हप्ता जमा होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च रोजी जमा होऊ शकतो. केंद्र सरकारने पण याविषयीची अधिकृत तारीख घोषीत केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पीएम किसानच्या अधिकृत खात्यावरून सरकारने अंतिम तारखेची घोषणा केली आहे. पीएम किसानच्या अधिकृत खात्यावरून याविषयीची एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यानुसार, तीन दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे.

13 मार्च रोजी पीएम किसानचा हप्ता

पी एम किसान योजनेचा 22 वा हप्ता (PM Kisan 22nd Installment) कधी जमा होणार याची शेतकऱ्यांमध्ये प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. समाज माध्यमावर केलेल्या पोस्टनुसार शेतकरी सन्माननिधी योजनेचा हप्ता येत्या 13 मार्च रोजी जमा होईल. याविषयीची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यापूर्वी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर या तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तरच हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

पीएम किसानचा या शेतकऱ्यांना लाभ नाही

शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर भरणारे शेतकरी या योजनेच्या परीघाबाहेर आहेत. पीएम किसान योजनेतंर्गत काही नियम बदलण्यात आले आहे. त्यानुसार एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच योजनेचा लाभ मिळेल. इतर सदस्यांचा पत्ता कट होईल. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली आली आहे.

अगोदर या गोष्टीची पूर्तता करा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता पात्र शेतकर्‍यांना मिळणार आहे. ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना योजनेची रक्कम मिळणार नाही. योजनेचा हप्ता खात्यात जमा होईल की नाही हे शेतकऱ्यांना घरबसल्या तपासता येईल. लाभार्थ्यांच्या यादीत नाव आहे की नाही हे तपासता येईल. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जाऊन लाभार्थ्यांच्या यादी तपासता येईल. त्यासाठी आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवावा लागेल. “Get Data” वर क्लिक केल्यावर पेमेंट स्टेट्स चेक करता येईल.

हे सुद्धा वाचा

Horoscope Today 10th March 2026 : कोणाचा दिवस चमकणार, कोणाला घ्यावी लागेल काळजी? आज तुमच्या राशीत काय ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

जंगल परिसरात कोसळलेल्या कोलंबियन लष्करी C-130 विमानाचे अवशेष

कोलंबियात भीषण विमान दुर्घटना: 110 जवानांसह C-130 कोसळले; 66 हून अधिक मृत, बचावकार्य सुरू

इराण-इस्रायल युद्ध थांबणार? 9 एप्रिलला अमेरिकेची मोठी भूमिका; इस्रायली अधिकाऱ्यांचा दावा

Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   

सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल

Parbhani Accident : स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच!

Gold And Silver Price: सोने-चांदीची स्वस्ताईची गुढी! गुढीपाडव्याला किंमती इतक्या झाल्या कमी, ग्राहकांचा आनंद गगनात मावेना