टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Parbhani Accident : स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच!

Accident News: ट्रॅव्हल्स चालक संतोष केशवराव शिंदे (वय ४९, रा. संभाजीनगर) हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगराला हलवण्यात आलं आहे.

परभणी : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपूर शिवारात रविवारी सायंकाळी भीषण अपघातात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत अन्य चौघे जखमी झाले आहेत. स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच १२ जीएफ ६२५९) हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून मंठा दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स (क्र. एमएच २० डीडी ७६६६) ने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यापासून सुमारे ५० ते ६० फूट फेकली गेली. अपघातात कारचा अक्षरशः चक्कचूर झाला आहे. कारमधून सय्यद अजहर सय्यद महमूद हे आपल्या कुटुंबीयांसह मंठा येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते, पण बहीण भावाची भेट या अपघाताने होऊ शकली नाही.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, सय्यद इस्माईल सय्यद महमूद हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील रहिवासी आहेत. रमजान ईदचा सण साजरा केल्यानंतर रविवारची सुट्टी आल्याने सय्यद अजहर हे आपल्या कुटुंबीयांसह मंठा येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कारणे निघाले होते. काल रविवार दिनांक 22 मार्च रोजी दुपारी दोनच्या दरम्यान हे कुटुंबीय आपल्या कापल्या कारने चारठाणा मंठा महामार्गाहून जात होते. चार ठाण्याजवळ गणेशपूर परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून प्रवासी घेऊन येणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्स बसची व सय्यद कुटुंबीयांच्या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात सय्यद अबिदा महबूब, सय्यद सुमया अबिदा, सय्यद अबिद या तिघांचा जागेच मृत्यू झाला तर त्यांचा भाऊ सय्यद इस्माईल सय्यद महबूब हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तसेच सय्यद साहिधा अबिद सय्यद जोहेरा अंजुम आबिद व सय्यद मिरज हे गंभीर जखमी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये एकूण १३ प्रवासी होते. त्यापैकी ४ ते ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. वाहनांचे पत्रे कापून जखमींना बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून वेगमर्यादा आणि सुरक्षित वाहनचालन याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल

Gold And Silver Price: सोने-चांदीची स्वस्ताईची गुढी! गुढीपाडव्याला किंमती इतक्या झाल्या कमी, ग्राहकांचा आनंद गगनात मावेना

Pimpri Chinchwad Accident: काळाचा घाला! लेह-लडाखवरून परतताना पिंपरीतील 3 मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; 30 फूट खोल दरीत कार कोसळून मृत्यू

जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, आता 200 दिवसांपर्यंत…

Raj Thackeray: राज ठाकरेंची आज डरकाळी, ठाकरे बंधुंच्या युतीनंतर मनसेच्या मेळाव्यात टार्गेटवर कोण कोण?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता केव्हा? आली की आनंदवार्ता, या दिवशी खात्यात जमा होणार पैसा