पंत, जडेजा, पडिक्कल, आकाश IN, शमीकडे दुर्लक्ष; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाकडून कोणा कोणाला संधी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

India Test Squad vs South Africa 2025: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे.

India Test Squad vs South Africa 2025: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा (Ind vs SA) संघ जाहीर केला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा (India Test Squad vs South Africa 2025) यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा संघात परतला आहे. 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारताची ही तिसरी कसोटी मालिका असणार आहे.

ऋषभ पंतला (Rishabh Pant) इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या कसोटीत दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर तो आशिया कप, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळू शकला नाही. यामुळे 100 हून अधिक दिवसांनंतर ऋषभ पंतचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. तसेच आकाश दीपचेही संघात पुनरागमन झाले आहे. ऋषभ पंतच्या समावेशामुळे एन. जगदीसनला संघाबाहेर जावे लागले. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आकाश दीपला संधी देण्यात आली आहे.

मोहम्मद शमीकडे दुर्लक्ष- (Mohammed Shami)

बंगालकडून तीन रणजी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करूनही अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याची भारतीय संघात निवड झाली नाही. शमीने आपल्या शानदार 3 कौशल्याच्या जोरावर बंगालला उत्तराखंड आणि गुजरातविरुद्ध सलग विजय मिळवून दिला. शमीने या तीन सामन्यांत एकूण 93 षटके टाकताना 15 हून अधिक विकेट्स पटकावल्या होत्या. मात्र या कामगिरीनंतरही दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शमीची निवड झालेली नाही. त्यामुळे शमीकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात कोणा कोणाला संधी देण्यात आली आहे, जाणून घ्या…

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ- (India Test Squad vs South Africa 2025 Test)

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)

पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)

दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)

पहिला एकदिवसीय सामना: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)

दुसरा एकदिवसीय सामना: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)

तिसरा एकदिवसीय सामना: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)

पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम, कटक)

दुसरी टी-20: 11 डिसेंबर (पीसीए स्टेडियम)

तिसरी टी-20: 14 डिसेंबर (एचपीसीए स्टेडियम)

चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)

पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon