Pandharpur Vitthal: विठुरायाला तुळशी अत्यंत प्रिय असते आणि त्यामुळे भाविक सोन्याच्या तुळशी पानांचे हार देवाला अर्पण करीत असतात
1/5

पंढरीच्या विठुरायाला सोनेरी तेजाने लखलखणारी तुळशीची माळ दान करण्यात आली आहे. ही तुळशी माळ 43 पानं आणि 88 मण्यांनी मढवली आहे.
2/5

पंढरपूर येथील विठ्ठल भक्त श्रीमती अलका अंकुश घाडगे यांनी विठुरायाच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण केली आहे.
3/5

या तुळशी माळेचे वजन 60.78 ग्रॅम असून याची अंदाजे किंमत पाच लाख 14 हजार इतकी होत आहे.
4/5

विठुरायाला तुळशी अत्यंत प्रिय असते आणि त्यामुळे भाविक सोन्याच्या तुळशी पानांचे हार देवाला अर्पण करीत असतात. या तुळशी माळेला 43 पाने व 88 व्हर्टिकल मणी आहेत.
5/5

यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते या देणगीदार भाविकांचे विठुरायाची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.