India vs Australia T20I Series Schedule : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेनंतर आता टी20 मालिकेची वेळ आली आहे.
India vs Australia T20I Series Schedule : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेनंतर आता टी20 मालिकेची वेळ आली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताला वनडे मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, सिडनीत झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जबरदस्त फलंदाजी करत भारताला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला.
आता चाहत्यांचे लक्ष्य पाच सामन्यांच्या टी20 मालिकेकडे लागले आहे, ज्यात टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहेत. चला तर पाहूया भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक आणि प्रसारणाची सविस्तर माहिती.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक
- पहिला टी20 : 29 ऑक्टोबर – मनुका ओव्हल, कॅनबेरा
- दुसरा टी20 : 31 ऑक्टोबर – मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न
- तिसरा टी20 : 2 नोव्हेंबर – ब्लंडस्टोन अरेना, होबार्ट
- चौथा टी20 : 6 नोव्हेंबर – गोल्ड कोस्ट
- पाचवा टी20 : 8 नोव्हेंबर – ब्रिस्बेन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सुरू होतील. भारतीय प्रेक्षक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेतील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध भारतीय भाषांमध्ये पाहू शकतील. तर ऑनलाइन प्रेक्षकांसाठी ही मालिका JioHotstar या प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
संबंधित बातम्या
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 संघ –
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर
ऑस्ट्रेलियन संघ : मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट (सामने 1-3), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन (सामने 3-5), टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस (सामने 4-5), नाथन एलिस, जोश हेझलवूड (सामने 1-2), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल (सामने 3-5), मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा



