कोळा जिल्हा परिषद गटात कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही-आ.डॉ.बाबासाहेब देशमुख

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

कोळा येथे किरण पांढरे,अमृत पाटील, छाया कोळेकर यांच्या प्रचारानिमित्त विराट रेकॉर्ड ब्रेक सभा संपन्न

कोळा (वार्ताहर):-कोळा जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सांगोला विकास आघाडीचे कोळा जिल्हा परिषदेचे उमेदवार केरप्पा उर्फ किरण भाऊ पांढरे, हातीद पंचायत समिती गणाचे उमेदवार अमृत नारायण तात्या पाटील व कोळा पंचायत समितीच्या उमेदवार सौ छायाताई सोपान कोळेकर या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. पूर्वीपासूनच कोळा भाग हा आबासाहेबांचा बालेकिल्ला असून कोळा भागात सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर अन्याय व दादागिरी खपवून घेतली नाही, असे प्रतिपादन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले.

कोळा येथे अर्जुन चौकात झालेल्या विराट सभेत आ. देशमुख बोलत होते.यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, खंडू तात्या सातपुते, उमेदवार किरणभाऊ पांढरे, उमेदवार छायाताई सोपान कोळेकर, उमेदवार अमृत पाटील यांच्यासह नेतेमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आम. बाबासाहेब देशमुख म्हणाले, ग्रामदैवत लक्ष्मीदेवी, रुद्रपशुपती कोळेकर महास्वामी, यांच्या पावन झालेल्या भूमीत या भागातील तरुणांनी वडीलाचे छत्र हरपलेले किरण भाऊ यांना भक्कम साथ दिली आहे.किरणभाऊ रोजंदारीने कामाला जात होते. हॉटेलमध्ये त्यांनी काम केले.ं पंम्चर चे दुकान काढले.सांगोला विकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. माजी आमदार माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये टाकतो असे बोलून गेले आहेत. त्यांना सांगतो,मी पण गणपतराव देशमुख यांचा नातू आहे,तुमचं सरकार आहे तर पहिल्यांदा मला जेलमध्ये टाका, असे सडेतोड उत्तर दिले. गटातील तीनही उमेदवारांनी प्रचारात मुसंडी घेतली आहे.लोकांचे प्रेम व गर्दी पाहून मन भारावून गेले आहे. विकास आघाडीच्या सभांना प्रचंड गर्दी होत असून आघाडीचा विजय निश्चित आहे.

गावात वेगळा पांयडा न पाडता, भूलथापांना बळी पडू नका. निवडणूक आली की रस्ते, डीपी, डांब रोवणे सुचतंय, परंतु त्यास कनेक्शन मिळणार नाहीत मग बोडक्या डांबाला मते देता का? यासाठी मतदारांनी या भूलभुलय्याच्या गोष्टीला बळी पडू नका, जे आपल्या सुखात व दुःखात साथ देतात त्यांनाच साथ द्या व विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आ देशमुख यांनी शेवटी सांगितले.

मा.आम.दीपकआबा म्हणाले, कोळे गावाने सांगोला तालुका विकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे साथ देऊन गावाचा एकोपा टिकवून नारळ चित्र पाहून मतदान करा. माझा कार्यकर्ता रात्रीचा दिवस करेल व आघाडीचा उमेदवार विजय केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला कोणाच्याही आमिषाला, बळी न पडता विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही मा. आ साळुंखे पाटील यांनी केले आहे.

उमेदवार किरण भाऊ पांढरे म्हणाले,सांगोला विकास आघाडीने माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे.मी सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करत राहणार आहे. येणार्‍या काळात गोरगरीब लोकांच्या अडचणी समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे,असे किरण भाऊ पांढरे यांनी सांगितले.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या स्वागतासाठी जुनोनी ते कोळा मोटरसायकल रॅलीमध्ये हजारो तरुणांनी सहभाग घेऊन रॅली यशस्वी केली

कोळा गावात डॉ. देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेला हजारोंची गर्दी जमली होती. या मेळाव्यास कोळा जिल्हा परिषद गटातील कोळा जुनोनी किडबिसरी तिप्पेहळी गौडवाडी हातीद जुजारपूर हटकर मंगेवाडी या गावातील सर्व शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon