टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

NCP Merger: देवेंद्र फडणवीस अचानक अमित शाहांच्या भेटीला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा? दिल्लीत घडामोडींना वेग

Follow Us:

NCP Merger: जिल्हा परिषद निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री अचानक दिल्ली दौरा केलाय.

NCP Merger: जिल्हा परिषद निवडणुकांनंतर (ZP Election 2026) महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी रात्री अचानक आणि गोपनीय पद्धतीने दिल्ली दौरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत (NCP Merger) पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, मित्रपक्षांमधील समन्वय आणि आगामी राजकीय वाटचाल यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरही खल झाल्याचे बोलले जात आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळत असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटातील काही नेत्यांमध्ये यापूर्वीच विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आल्याने या चर्चांना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या तातडीच्या आणि गोपनीय दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. विलिनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांमध्येही चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होणार

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सायंकाळी पावणे सात वाजता दिल्लीला रवाना होणार असून, उद्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी हा दौरा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Sunetra Pawar: फडणवीसांनंतर सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व

या दिल्ली दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे देखील सोबत असणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दौरा आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा नियोजित दिल्ली दौरा यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चांना नवे बळ मिळाले आहे. पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय असणार, विलिनीकरणावर अंतिम निर्णय होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य