सांगोला (प्रतिनिधी):- श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी महिला मंच सांगोला. यांच्या वतीने सांगोला शहर, परिसर व तालुक्यातील महिलांच्यासाठी शनिवार दि.15/3/2025 रोजी सकाळी 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह (टाऊन हॉल) सांगोला येथे मिसेस सांगोला 2025 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मंचाच्या अध्यक्षा सौ लता कांबळे यांनी दिली.
ही स्पर्धा सर्व विवाहित व श्रीमती महिलांच्यासाठी आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 4 बक्षिसे तसेच 3 टायटल बक्षीसे व लकी ड्रॉ ची 10 बक्षिसे असणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 5001/ क्राऊन व सन्मान चिन्ह, द्वितीय बक्षीस रोख रक्कम 3001/ सन्मान चिन्ह, तृतीय बक्षीस रोख रक्कम 2001/व सन्मान चिन्ह, उत्तेजनार्थ बक्षीस रोख रक्कम 1001/ व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत. इतर बक्षिसांच्या मध्ये बेस्ट वेशभूषा, बेस्ट टॅलेंट, बेस्ट व्यक्तिमत्व व लकी ड्रॉ ची एकूण 10 बक्षीस असणार आहेत. स्पर्धा प्रवेश नोंदणी फी 200/ रुपये असून नाव नोंदणी ची अंतिम तारीख 12 मार्च पर्यंत आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी सौ स्नेहा कुमठेकर 9028653174, सौ रेशमा दिवटे 9271728586 सौ अश्विनी कांबळे 8177979520 यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेच्या ठिकाणी खाद्यपदार्थ व इतर स्टॉल ही असणार आहेत. त्याची नोंदणी फी 150/रुपये तसेच लकी ड्रॉची फी 10/ रुपये असणार आहे.स्टॉल साठी नाव नोंदणी सौ तनुजा दौंडे 9665676692, सौ वर्षा दौंडे 9766554141 सौ वर्षा लाटणे 8600570989 यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी आवश्यक, परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल, स्पर्धा वेळेत सुरू होईल, टॅलेंट राऊंड साठी 5 मिनिट वेळ असेल, कलाविष्कार राऊंडसाठी स्पर्धकांनी स्वतःचे साहित्य आणावे,( नृत्य, गायन व सादरीकरणासाठी पेन ड्राईव्ह मोबाईल इत्यादी) अधिनियम व अटी आहेत.
स्पर्धेचे स्वरूपामध्ये रॅम्प वॉक बरोबर 4 महत्त्वाचे राऊंड असणार आहेत. त्यामध्ये पहिला राऊंड पारंपारिक वेशभूषा, दुसरा कलाविष्कार, तिसरा वेस्टर्न रॅम्प वॉक, चौथा प्रश्नमंजुषा या राऊंडमधून 3 टायटल बक्षीस काढली जातील.
स्पर्धेच्या दोन दिवस आधी स्पर्धकांना ट्रेनिंग व स्पर्धेचे अधिक माहिती दिले जाईल. तरी सांगोला शहर परिसरातील महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी महिला मंचाच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सौ.लता कांबळे (मो.9420307901) यांच्याशी संपर्क साधावा.