टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

विधान परिषदेतील रिक्त जागांसंदर्भात हालचालींना वेग; राज्यपाल कोट्यातील 5 जागांवर कुणाची वर्णी लागणार?

Follow Us:

Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यपाल कोट्यातील 5 रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेतील (Maharashtra Legislative Council) राज्यपाल कोट्यातील 5 रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान या रिक्त जागा भरण्या संदर्भात आता हालचालींना वेग आले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यात प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 5 जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Maharashtra Vidhan Parishad)

Maharashtra Vidhan Parishad : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य

विधान परिषदेत एकुण 78 सदस्य संख्या आहे. त्यापैकी 55 सदस्य सध्या आहेत तर 23 जागा रिक्त आहेत. यापैकी 14 मे 2026  ला विधान परिषदेच्या आणखी 9 जागा रिक्त होत आहेत. या 9 ही जागा विधानसभा सदस्य यांच्यातून निवडून आलेल्या आहेत. त्यापैकी उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुदत 13 मे रोजी संपत आहे. सध्या विधानसभेत 286 आमदार आहेत त्यामुळे 36 आमदारांच्या मतदानाचा कोठा ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील 5 रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यात प्राधान्य दिले जाण्याची माहिती आहे.

Maharashtra Legislative Council : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची रचना

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या 78 इतकी आहे. विधानसभेप्रमाणं परिषद दर 5 वर्षांनी भंग होत नाही. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. 78 सदस्यांपैकी 30 सदस्य विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदानाद्वारे निवडून दिले जातात. तर, शिक्षकांमधून 7 आमदार, पदवीधरांमधून 7 आमदार निवडले जातात. तर, राज्यपाल साहित्य, कला, सहकार  आणि सामाजिक सेवा यातून 12 आमदारांची नियुक्ती करतात.

काय आहे राज्यसभेच गणित? (Rajyasabha)

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण 7 जागा 2 एप्रिल 2026 मध्ये रिक्त होणार आहेत.

कोणत्या जागा रिक्त होणार आहेत? 

  1. शरद पवार, राष्ट्रवादी, (एसपी)
  2. रामदास आठवले ( भाजपच्या कोट्यातून आरपीआय आठवले गट)
  3. भागवत कराड, भाजप
  4. धैर्यशील पाटील, भाजप
  5. प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना (युबीटी)
  6. रजनी पाटील, काँग्रेस
  7. फौजीया खान, राष्ट्रवादी (एसपी)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य