मोदी का दिमाग थंडा है, लेकीन लहू गरम है; राजस्थानमधून PM मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

आपल्या देशात गेल्या 11 वर्षात अभूतपूर्व काम करण्यात आलं आहे, या कामावर आधी जितके पैसे खर्च व्हायचे त्याच्यापेक्षा 6 % जास्त पैसे खर्च होतं आहेत.

जयपूर : देशातील 18 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश देखील आपल्यासोबत रेल्वेने जोडले गेले आहेत. करणीमातेच्या आशीर्वादाने विकसित भारत बनवण्याचा संकल्प पूर्ण होतं आहे. आज 26 हजार करोड रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण झालं असून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. विकसित भारत बनवण्यासाठी आज देशात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी यज्ञ सुरू आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) आपल्या भाषणाची सुरुवात केली. राजस्थानच्या बिकानेर येथे रेल्वेच्या (Railway) पायाभूत विकासाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्याहस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणातून मोदींनी पुन्हा एकदा दहशतवादी आणि पाकिस्तानला (Pakistan) थेट शब्दात इशारा दिला आहे. तसेच, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं झुकने दूंगा.. असेही मोदींनी म्हटले.

आपल्या देशात गेल्या 11 वर्षात अभूतपूर्व काम करण्यात आलं आहे, या कामावर आधी जितके पैसे खर्च व्हायचे त्याच्यापेक्षा 6 % जास्त पैसे खर्च होतं आहेत. भारताचा विकास पाहून आज जगभरातील देश हैराण झाले आहेत. भारत आपल्या ट्रेन नेटवर्कला देखील आधुनिक करत आहेत, नवीन गती आणि नवीन प्रगतीचं हे प्रतीक आहे. 70 रुट्सवर वंदे भारत पोहोचत आहे, 34 हजार किलोमीटर पेक्षा जास्त रेल ट्रॅक बसवले गेले आहेत. रेल्वे स्टेशनची आधी काय हालत होती हे सगळ्यांना माहित आहे, असे म्हणत मोदींनी रेल्वेच्या पायाभूत विकासाची माहिती दिली. त्यानंतर, पहलगाम हल्ला आणि भारताने पाकिस्तान व दशतवादाविरुद्ध घेतलेली भूमिका यावर भाष्य केलं. मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.

गोलिया पहलगाम में चली थी, इन आतंकवादीयों कों कल्पनासे परी सजा देंगे ऐसा हमने कहां था. आपल्या सरकारने देशाच्या तिन्ही सैन्य दलास पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्यामुळेच, तिन्ही सैन्य दलाने एकत्र येऊन चक्रव्यूह रचलं, पाकिस्तानना गडघे टेकायला भाग पाडलं, असे म्हणत मोदींनी भारतीय सैन्य दलाच्या कारवाईचं कौतुक केलंय. 22 तारखेला झालेल्या हल्ल्याच्या उत्तरात 22 मिनिटांत भारताने 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले.  जेव्हा देशातील महिलांच्या कपाळाचं कुंकू स्फोटकं बनत तेव्हा काय होतं, हे आम्ही दाखवून दिलं, असेही मोदींनी म्हटले. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं झुकने दूंगा. जो सिंदूर मिटाने निकले थे उन्हे हमने मिट्टी में मिलाया हैं, असे म्हणत मोदींनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. जे हत्यारांवर गर्व करायचे ते आज मृत्यूच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत, हा शोध प्रतिशोध नाही तर न्यायाचं नवं स्वरूप आहे. हा आक्रोश नाही तर समर्थ भारताचे रौद्र रुप आहे, नव्या भारताचे स्वरूप आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर घणाघात केला.

मोदी का दिमाग थंडा है, लेकीन लहू गरम है

अॅटम बॉम्बच्या धमकीने भारत घाबरणार नाही, आता वार केला तर आम्ही खपवून घेणार नाही. वेळ आणि जागा आमचे जवान ठरवतील. सध्या, जगातील बहुतांश देशात पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी आपण विश्वात फिरत आहोत. सर्व पक्षातील नेते या शिष्टमंडळात आहेत. आता, पाकिस्तानचा खरा चेहरा देशाला दाखवू, पाकिस्तान कधीही आपल्याशी सरळ लढूच शकत नाही, म्हणून दहशतवाद्यांना त्यांनी एक हत्यार बनवलं आहे. मोदी का दिमाग थंडा होता है, लेकिन लहू गरम है. मोदी के शरीर में लहू नही गरम सिंदूर बेहेता हैं.. असे म्हणत मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. तसेच, पाकिस्तान की सेना और अर्थव्यवस्था ये किंमत चुकाएगी, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा

MI vs DC IPL 2025 : आयपीएलच्या टॉप-4 संघांवर शिक्कामोर्तब! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ‘मुंबई इंडियन्स’ची प्लेऑफमध्ये धडक, दिल्ली बाहेर

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon