मोबाईल टॉवर म्हणजे संकट, थेट होतो कर्करोग? जाणून घ्या नेमकं सत्य काय?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

तुम्ही तुमच्या घराच्या बाजूला किंवा परिसरात टॉवर पाहिले असतील. याच मोबाईल टॉवरमुळे कर्करोग होतो, असा दावा केला जातो. याच दाव्यावर आता भारत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक टॉवर्स पाहिले असतील. त्या परिसरातील मोबाईल्सना रेंज मिळावी, संदेश वहनाचे काम सुरळीत चालावे यासाठी हे टॉवर्स लावले जातात. परंतु याच टॉवर्सबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. परिसरात टॉवर्स लावला तर कॅन्सर म्हणजेच कर्करोग होईल, अशई भीती व्यक्त केली जाते. आता याच भीतीबाबत भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.

1 / 5

तुमच्या आजूबाजूला जे टॉवर्स असतात त्यातून काही रेडिएशन निघतात. याच रेडिएशनमुळे तुम्हाला कर्करोग होऊ शकतो तसेच इतरही काही आजार होऊ शकतात, असा दावा केला जातो. याच दाव्याला बळी पडून काही लोक टॉवरची मनात भीती बाळगतात. परंतु आता टॉवरबाबत भारत सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

2 / 5

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक्स या सोशल मीडियावरील खात्यावर लोकांच्या मनात असलेल्या भीतीबात सांगितले आहे. मोबाईल टॉवरमुळे कोणताही आजार होत नाही. तसेच कर्करोग होण्याची भीती नसते, असे सरकारने सांगितले आहे. हे स्पष्टीकरण देताना सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षांचा आधार घेतला आहे.

3 / 5

भारत सरकारने सांगितल्यानुसार मोबाईल टॉवरमधून निघणारे तरंग हे ठरवून दिलेल्या नियमांमध्ये असतात. तसेच या तरंगांमुळे सुरक्षा मानकांचे उल्लंघन होत नाही. म्हणजेच मोबाईल टॉवरमुळे कर्करोग तसेच इतर आजार होत नाहीत. एखाद्या टॉवरने सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्यास लगेच कारवाई केली जाते.

4 / 5

तसेच संबंधित टॉवर बंद केले जाते. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन भारत सरकारने केले आहे. मोबाईल फोन आणि मोबाईल टॉवर हे कमी शक्तीवर काम करतात. मोबाईलमधील रेडिओ ट्रान्समीटर हे जवळच्या टॉवरशी संपर्क करतात. त्यानंतर फोन कॉल लागतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सरकारने सांगितले आहे.

5 / 5

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon