MI vs DC IPL 2025 : आयपीएलच्या टॉप-4 संघांवर शिक्कामोर्तब! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ‘मुंबई इंडियन्स’ची प्लेऑफमध्ये धडक, दिल्ली बाहेर

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

IPL Points Table 2025 : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला. यासह, मुंबईने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे आणि दिल्ली प्लेऑफमधून बाहेर पडली आहे.

Mumbai Indians beat Delhi Capitals : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि यासह आयपीएल प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. तर या पराभवामुळे दिल्ली प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. या सामन्यात एमआय संघाने प्रथम फलंदाजी करत 180 धावा केल्या. मुंबईने शेवटच्या 2 षटकांत 48 धावा जोडून ही मोठी धावसंख्या उभारली होती, त्यानंतर दिल्लीला फक्त 121 धावा करता आल्या. मुंबईच्या विजयाचे हिरो सूर्यकुमार यादव, बुमराह आणि सँटनर ठरले.

Image

आयपीएलच्या टॉप-4 संघांवर शिक्कामोर्तब! 

दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना पंजाब किंग्ज विरुद्ध आहे. हा सामना 24 मे रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल. प्लेऑफमध्ये पोहोचणारे 4 संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नंतर मुंबई आता प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon