Maharashtra HSC Results : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा (12th Exam Result 2025) निकाल जाहीर करण्यात आला असून असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
Maharashtra HSC Board 12th Result 2025 : पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (Maharashtra HSC Results 2023 Declared) इयत्ता बारावीचा निकाल (12th Results) जाहीर केला. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. तसेच, दुपारी 1 वाजल्यापासून बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची ऑफिशिअल वेबसाईट mahresult.nic.in वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच, उद्यापासून (6 मे) महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.
विभागनिहाय निकाल
- कोकण : 97.51 टक्के
- पुणे : 94.44 टक्के
- कोल्हापूर : 94.24 टक्के
- अमरावती : 93 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
- नाशिक : 94.71 टक्के
- लातूर : 92.36 टक्के
- नागपूर : 93.12 टक्के
- मुंबई : 91.95 टक्के
बारावीचा निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, आईचं नाव आवश्यक
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिलं नाव आवश्यक असेल. निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
बारावीचा निकाल कसा पाहाल?
- सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
- होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
- तुमच्या हॉल तिकीटावरील क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC) परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या सर्व विभागातील मिळून १४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. यंदा बारावीचा निकाल ८८ टक्के लागला आहे. १४ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली. १४ लाख १७ हजार ९६९ बसले. १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी पास झाले आहेत. बारावीचा निकाल जाहीर झाला असून कोकण विभाग अव्वल आहे. यंदाही मुलींची बाजी मारली आहे.