Maharashtra Breaking News Today LIVE: ‘यारी में गद्दारी नहीं… गद्दारों से यारी नहीं’; शायराना प्रचारसभा….

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 05 January 2026: उद्धव ठाकरे यांची 9 जानेवारीला नाशिक येथे जाहीर सभा होणार तर 10 जानेवारीला संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. आगामी ठाणे महानगर निवडणुक निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाणेकर नागरिकंबरीबर चर्चा होणार आहे. धुळे महानगरपालिकेच्या भाजपा  प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण धुळ्यात दाखल झाले आहेत. रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेवर टीका करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 05 January 2026: अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्या ३२ उमेदवारांच्या प्रचारासाठी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी अकोल्यात दाखल झाले होते.या सभेत लाठीचार्जनंतर पोलीस व नागरिकांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र उपस्थित नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि वाद निवळला.  देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मुंबईचा विकास झाला अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेडमध्ये दिली.धुळ्यातील शिख समाज बांधवांचे धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन सुरु आहे. महिलांसह मोठ्या सख्येत शीख समाज बांधव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून आहेत.

5 Jan 2026, 09:59 वाजता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्रामदैवत उत्तेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गावच्या वाटेवर 

दरे गावातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री उत्तेश्वर ग्रामदैवत यात्रेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंब दरे गावात मुक्कामी आले आहेत उतेश्वर ग्रामदेवतांच्या यात्रे साठी दरवर्षी ते गावी येतात. यावर्षी देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून त्यांनी कुटुंबासह शंभू महादेवाच्या चरणी माथा टेकत दर्शन घेतले. दरे गावचे ग्रामदैवत असलेल्या उत्तेश्वर यात्रेला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी तसेच कुटुंबीयांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अभिषेक आणि पूजाअर्चा केली.उत्तेश्वर देवस्थानाच्या जिर्णोद्धारासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, आणि याच पार्श्वभूमीवर दरवर्षी कुटुंबीयांकडून अभिषेक केला जातो. आज सकाळी दर्शनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सुमारे अकरा वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत.

5 Jan 2026, 09:46 वाजता

‘यारी में गद्दारी नहीं… गद्दारों से यारी नहीं’; शायराना प्रचारसभा…

‘जिंदगी में एक ही उसूल रखना… यारी में गद्दारी नहीं… गद्दारों से यारी नहीं’. अशी शेरोशायरी करत लातूर मनपा निवडणुकीच्या प्रचारसभेत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी विरोधकांना सूचक टोला लगावला आहे. लातूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे. या युतीच्या जाहीर सभेत आमदार देशमुख यांनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर थेट निशाणा साधला आहे

 

5 Jan 2026, 09:13 वाजता

निवडणूक आयोगावरील आरोपावरुन जेडीएसचा यूटर्न

निवडणूक आयोगावरील आरोपावरुन जेडीएसचा यूटर्न. राज्य निवडणूक आयुक्तांना जेडीएसचं पत्र. गैरसमज दूर, आयुक्त दिनेश वाघमारेंना पत्र. कुठलीही तक्रार नसल्याचं जेडीएसचं स्पष्टीकरण येताच राजकीय वर्तुळात अनेकांनी भुवया उंचावल्या. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात तक्रार केली. प्रत्यक्षात हरिभाऊ राठोडांकडून नार्वेकरांविरोधात तक्रार
राठोड यांचा मुलगा जेडीएसकडून अर्ज भरणार होता. मात्र अवघ्या दोनच दिवसात जेडीएसचा यूटर्न पाहायला मिळत आहे.

5 Jan 2026, 09:03 वाजता

महायुतीच्या बिनविरोध विजयाविरोधात विरोधक आक्रमक; मनसे कोर्टात जाणार

राज्यात महायुतीचे 65-70 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत…यावरून विरोधक आक्रमक झाले. मनसे या बिनविरोध पॅटर्नविरोधात कोर्टात जाणार आहे… पैशांचं आमिष, तपास यंत्रणांचा दबाव टाकून विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप मनसेनं केलाय..सोबत आपल्याकडे काही पुरावेही असल्याचं मनसे नेते अविनाश जाधवांनी सांगितलंय. हे सर्व पुरावे मनसे कोर्टात सादर करणार आहे.

5 Jan 2026, 08:56 वाजता

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ताकदवान आणि वारसदारामुळे अनेक प्रभागात तुल्यबळ लढती

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ताकदवान आणि वारसदारामुळे अनेक प्रभागात तुल्यबळ लढती पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध नवखा चेहरा, दोन यूवा कार्यकर्त्यातील लढत, महायुतीची प्रतिष्ठेची लढाई, दोन माझी नगरसेवकात काट्याची टक्कर असं चित्र निर्माण झाल्याने प्रत्येक उमेदवाराकडून जोरदार जोर बैठका काढल्या जात आहेत. प्रत्येक प्रभागात कडवी झुंज पाहायला मिळणार असून अनेक प्रभागात नेते आणि पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक देखील एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

5 Jan 2026, 08:26 वाजता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हर्चुअल सभेचे आयोजन

भारतीय जनता पक्षाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हर्चुअल सभेचे आयोजन केले आहे. ८ जानेवारी रोजी देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगरला एका बंदिस्त हॉलमध्ये सभा होणार आहे. या सभेचे प्रसारण एकाचवेळी ८० वॉर्डात करण्यात येणार आहे. निवडणुकीला कमी दिवस शिल्लक राहिल्यामुळे भाजपने अशी शक्कल लढविली आहे. एकाचवेळी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मतदानाला केवळ १० दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचता यावे. सभेसाठी जास्त श्रम खर्ची घालण्याऐवजी प्रत्येक उमेदवाराचा गर्दी आणण्याचा ताण वाचणार आहे.

5 Jan 2026, 08:10 वाजता

सतरा वर्षीय युवकाची आत्महत्या, गळफास घेऊन संपविल जीवन

अकरावी सायन्समध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय तरुणाने गळफास घेऊ आपलं जीवन संपविल्याची घटना परभणीच्या गंगाखेड शहरातील मन्नाथनगर भागात घडलीय. कृष्णा घरजाळे अस या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा डोंगर जवळा येथील रहिवासी असून गंगाखेड शहरातील मन्नाथनगर परिसरात कुटुंबियांसोबत राहत होता, कृष्णा पुणे येथे क्लासेस करीत होता,आठ दिवसापूर्वीच तो गंगाखेड येथे आला होता,त्याने आत्महत्येसारख टोकाचं पाऊल का उचलल हे मात्र समजू शकले नाहीये,गंगाखेड पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आलीय.

 

5 Jan 2026, 06:42 वाजता

मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास मुंबईचं अदानिस्तान होईल  

मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास मुंबईचं अदानिस्तान होईल.. उद्धव ठाकरेंचा टोला. तर ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचं पाकिस्तान होईल. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा घणाघात.

5 Jan 2026, 06:41 वाजता

ठाकरे बंधूंचा वचननामा नाहीतर वाचूननामा  – फडणवीस

ठाकरे बंधूंचा वचननामा नाहीतर वाचूननामा. दोघांची युती कन्फ्यूज आणि करप्शनची. आमची युती करेक्शन आणि करेजची. मुंबईतील जाहीर सभेतून फडणवीसांची आगपाखड.

5 Jan 2026, 06:40 वाजता

मनपा प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात

महापालिका निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरत आहेत. उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये सभा होणार आहे. तर 10 जानेवारीला संभाजीनगरमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत.

5 Jan 2026, 06:39 वाजता

7 जानेवारीला फडणवीसांचा ठाणेकरांशी संवाद

आगामी ठाणे महानगर निवडणुक निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणेकरांशी संवाद साधणार आहेत. तर ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखतही घेणार आहेत. 7 जानेवारीला ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

5 Jan 2026, 06:37 वाजता

विश्वजीत कदम,विशाल पाटलांच्या उपस्थित काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली

सांगली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर प्रचाराला सुरुवात केली आली आहे.शहरातल्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये काँग्रेस आघाडीच्यावतीने उमेदवारांच्या प्रचारार्थी रॅलींचा आयोजन करण्यात आलं होतं.शहरातल्या प्रभाग 16 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार विश्वजीत कदम,खासदार विशाल पाटील यांच्यासह आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पदयात्रा काढण्यात आली.यावेळीआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,यावेळी विश्वजीत कदम यांनी भाजपावर निशाणा साधताना राज्यात भाजपाची सत्ता आहे, आमदार भाजपाचे आहेत, खासदार देखील भाजपाचे होते,मग सांगलीचा विकास का, केला नाही ? सांगली बाबत मुख्यमंत्र्यांच्या केवळ निवडणुकी पुरताच घोषणांचा पाऊस झाला,अशी टीका याप्रसंगी आमदार विश्वजीत कदम यांनी केला

4 Jan 2026, 23:06 वाजता

अमित शाह यांचा दोन दिवसांचा तमिळनाडू दौरा

तमिळनाडूत मार्च मध्ये निवडणूका होणार आहेत. त्याआधी अमित शहांचा का दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. डीएमकेनं हिंदी, हिंदुत्व आणि उत्तर दक्षिण या तीन मुद्द्यांच्या आधारे स्ट्रांग नॅरेटीव तयार केलं आहे. हे नॅरेटिव मोडीत काढण्यासाठी अमित शाह यांचा दौरा.

4 Jan 2026, 23:05 वाजता

 उमर खालिदच्या जामीन अर्जांवर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार

दिल्ली दंगली प्रकरणातील उमर खालिद, शरजील इमाम, गुल्फिशा फातिमा, मीरन हैदर आणि शिफा उर रहमान यांच्यासह सात आरोपींच्या जामीन अर्जांवर सर्वोच्च न्यायालय सोमवार, ५ जानेवारी रोजी आपला निर्णय देणार आहे.

4 Jan 2026, 23:05 वाजता

दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू

दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू, तीन दिवस प्रश्नोत्तराच्या तासावर लक्ष केंद्रित; ५ ते ८ जानेवारी दरम्यान बैठका आहेत. आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, वाहतूक, वित्त आणि शहरी विकास यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होईल. हे सत्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच होत आहे.

 

4 Jan 2026, 23:04 वाजता

अकोल्यात 60 हून अधिक उमेदवार निवडून येतील’ – मुख्यमंत्री

‘ही निवडणूक 45 टक्के लोकांवर परिणाम करणारी आहे.अकोल्यात विमान धावपट्टी तयार करणार… नवीन पाणी योजना सुरू केली आहे.रोज शुद्ध पाणी मिळेल…30 टक्के निधी जो महापालिकेला द्यावा लागतो ते ही आम्ही भरू, असे देवेंद्र फडणवीसांचं अकोलाकरांना आश्वासन दिलंय.

4 Jan 2026, 23:02 वाजता

अमित ठाकरे यांचा शाखा भेटी, निवडणूक प्रचार दौरा

मनसे नेते अमित ठाकरे आज मुलुंड, भांडुप, विक्रोळी येथील शाखांना भेटी देणार आहेत आणि निवडणूक प्रचार दौऱ्यावर असणार आहेत.

4 Jan 2026, 23:01 वाजता

उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर….

उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरसकाळी 11 वाजता तळा येथील नगरपंचायत प्रशासकीय इमारत भूमिपूजन सोहळा होणार आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon