Maharashtra Breaking News Today LIVE Updates 30 December 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुमशान आहे ते महापालिका निवडणुकांचं. पाहा महत्त्वाच्या घडामोडी…
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 30 December 2025 : महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख उजाडलेली असतानाच काही पक्षांमध्ये आता उमेदवार यादीवरूनही असंख्य चर्चा डोकं वर काढताना दिसत आहेत. मोजून 16 दिवसांवर आलेल्या महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर, सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी, नियम बदल यासंदर्भातील माहितीसुद्धा सातत्यानं समोर येत आहे. वर्ष संपण्यास एक दिवस उरलेला असतानाच, 30 डिसेंबर 2025 या दिवशी कोणत्या घडामोडी ठरणार चर्चेचा दिवस? पाहा….

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी, 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुले
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता साईबाबा संस्थानकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.. जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून 31 डिसेंबरची शेज आरती आणि 1 जानेवारी रोजी पहाटेची काकड आरती होणार नाही.
30 Dec 2025, 10:39 वाजता
गोरेगाव भाजपात नाराजीचा भडका
वॉर्ड क्रमांक 54 मधील उमेदवारीवरुन भाजप कार्यकर्ते नाराज. गोरेगाव पूर्व विधानसभा महामंत्री संदीप जाधव यांचा पदाचा राजीनामा. संदीप जाधव बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार. भाजपकडून विप्लव अवसरेंना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष.
30 Dec 2025, 09:46 वाजता
शरद पवार घेणार अमित शाह यांची भेट; कारणही समोर…
साखर उद्योग आणि राज्यातल्या कारखानदारी संदर्भात लवकरच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार. अमित शहा यांची वेळ घेतली जाणार. अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगांनी कारखानदारी संदर्भात अमित शांतभेटीत तोडगा काढला जाणार. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवार यांची माहिती.

30 Dec 2025, 09:07 वाजता
पुणे ब्रेकिंग : शरद पवारांची राष्ट्रवादी 40 प्रभागात प्रत्येकी एक उमेदवार देणार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी 125 शरद पवारांची 40 जागा लढणार. पॅनल निवडून येण्यास सोपे जाण्यासाठी अजित पवारांचे तीन उमेदवार आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा एक उमेदवार प्रत्येक प्रभागात असणार. राजकीय अस्तितव टिकवण्यासाठी प्रत्येक प्रभागात आपला अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीची रणनीती.
30 Dec 2025, 09:06 वाजता
मोठी बातमी! नवी मुंबईत महायुती तुटली
भाजपा आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार. जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय. दोन्ही पक्ष सर्व 111 प्रभागातील इच्छुकांना देणार AB देण्यास सुरुवात.
30 Dec 2025, 08:55 वाजता
महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी आणली चक्क अडीच हजारांची चिल्लर
सोलापूर महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी आणली चक्क अडीच हजारांची चिल्लर. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणली चक्क अडीच हजारांची चिल्लर. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग नऊ मधून इच्छुक असलेले उमेदवार श्रीनिवास यांना निवडणूक आयोगाकडे भरले एक दोन रुपयांच्या नाणे स्वरूपात रक्कम. नाणी मोजता मोजता निवडणूक कर्मचारी चांगलेच वैतागले. प्रभाग नो मधून अपक्ष निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने निवडणूक कर्मचाऱ्यांना फोडला घाम.
30 Dec 2025, 08:25 वाजता
ईशान्य भारतातील विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू
उत्तराखंडच्या डेहराडून येथे शिकणाऱ्या त्रिपुराच्या अँजेल चकमा या 24 वर्षीय विद्यार्थ्यांचा स्थानिकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी देशभरात तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. ईशान्येकडील नागरिकांविरोधात द्वेषपूर्ण गुन्हे थांबवण्यासाठी सर्वकष प्रयत्न केले जावेत, अशी मागणी सर्व पक्षांच्या नेत्यांनी केली. अँजेलला 9 डिसेंबरला सहा जणांनी मारहाण केली होती. अँजेल याचा उपचार सुरू असताना 26 डिसेंबरला मृत्यू झाला. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी अँजेलच्या वडिलांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि या प्रकरणातील दोषींना कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजीजू यांनी अँजेलच्या हत्येबद्दल निराशा आणि संताप व्यक्त केला. त्याचवेळी याचे राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले.

30 Dec 2025, 08:01 वाजता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबी फॉर्म वाटले; पहिल्या फॉर्मचा मानकरी कोण?
मुंबईत पालिका निवडणुकीसाठी रात्री उशिरा इच्छुक माजी नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फॉर्म वाटले, यात पहिला एबी फॉर्म हा वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांना देण्यात आला. पालिका निवडणुकीत शिवसेना 90 जागांवर लढत असून शेवटच्या जागेपर्यंत भाजपसोबत वाटाघाटीत रस्सीखेच सुरू होती. बंडखोरी टाळणयासाठी शिंदेंकडून पूर्णतहा खबरदारी घेत रात्री उशिरा शिंदेंनी कुठलिही यादी न काढता, थेट इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटण्यास सुरूवात केली.
30 Dec 2025, 07:20 वाजता
महायुतीच्या बंडखोरांवर महाविकास आघाडीची नजर
जालना महानगरपालिकेसाठी 16 प्रभागांतून 65 नगरसेवक निवडले जाणार आहेत. सत्तास्थानी आपणच राहावे यासाठी सर्वच पक्ष अनेक व्यूहरचना अवलंबत आहेत. नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. महायुतीत जागावाटप ठरल्यानंतरच इच्छुकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यावर महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे. अगोदर यादी जाहीर केल्यास बंडखोरी होण्याच्या शक्यतेने महायुती सावध पावले टाकत आहे. एक-दोन नव्हे, महायुतीच्या सहा मॅरेथॉन बैठकांनंतरही जागावाटप निश्चित नसल्यामुळे मंगळवारी सकाळी जे काय ठरेल त्याकडे सर्व इच्छुकांचे डोळे लागले आहेत. मात्र, बंडखोरी आणि घरवापसीला लगाम लावण्यासाठी उमेदवारांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.
30 Dec 2025, 07:19 वाजता
संबंधित बातम्या
नाराजांची घर वापसी
ज्या व्यक्तीच्या घरवापसीकडे सर्व अकोला शहर चा लक्ष लागून होता ते भाजपचे नाराज हरीश अलीमचंदानी यांच्या कडे.अखेर आज अलिमचंदानी यांची घरवापसी झाली आहे. त्यांच्या तर्फे चर्चेत असलेली तिसरी आघाडी भाजपाला या निवडणुकीत डोकेदुखी ठरणार होती. विधानसभा निवडणुकीत भाजपशी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवलेले हरीश अलिमचंदानी यांनी अखेर भाजपमध्ये घरवापसी केली आहे. अलिमचंदानी यांचं बंड शमवण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागली होती. महापालिका निवडणुकीची घोषणा होताच हरीश अलिमचंदानी यांनी तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू करत भाजपविरोधात बंडाचा झेंडा फडकावला होता. त्यामुळे भाजपसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या हालचालींनंतर अखेर बंडखोरांना शांत करण्यात भाजपला यश आले आहे.आज भाजप कार्यालयात झालेल्या एका सोहळ्यात हरीश अलिमचंदानी यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.तर त्यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानून पक्ष जी जबाबदारी देईल ते स्वीकारण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
30 Dec 2025, 07:17 वाजता
अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, पण भाजपची गाडी अजूनही रखडलेली
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाही भारतीय जनता पक्ष अजूनही उमेदवारी यादी जाहीर करू शकलेला नाही. बंडखोरी टाळण्यासाठी आणि अंतर्गत असंतोष आटोक्यात ठेवण्यासाठीच उमेदवारी जाहीर करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याची चर्चा आहे. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप यांनी २८ डिसेंबर रोजी उमेदवारांची यादी जाहीर होईल, असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र ठरलेली तारीख उलटून गेली तरी यादी प्रसिद्ध न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे.
30 Dec 2025, 07:17 वाजता
जालन्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार
जालना महापालिका निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादी पक्ष बाहेर पडलीये… मागच्या काही दिवसात महायुती व्हावी यासाठी भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी तिनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या.. शेवटच्या बैठकीपर्यंत राष्ट्रवादी महायुती बरोबर होती.. मात्र भाजप शिवसेनेतच जागा वाटपावरून गोधंळ सुरु असून भाजपात गटबाजी असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर महायुतीत समाधानकारक जागा मिळत नाहीये. त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवत आहोत अशी घोषणा जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी केलीये.

30 Dec 2025, 07:16 वाजता
भंडाऱ्यात वनराजाचा रुबाब! कोरंभी-गोसेखुर्द मार्गावर पट्टेदार वाघाचा थरार
भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोरंभी परिसरात एका पट्टेदार वाघाने दर्शन दिल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रात्रीच्या सुमारास काही नागरिक चारचाकी वाहनाने गोसेखुर्द धरणाकडे जात असताना, रस्त्याच्या अगदी कडेला एका पट्टेदार वाघाचा मुक्त वावर त्यांना दिसून आला. वाघाला पाहताच पर्यटकांनी प्रसंगावधान राखून वाहन थांबवले आणि आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या वनराजाचा रुबाबदार चालतानाचा व्हिडिओ चित्रीत केला. जंगलाच्या शांततेत वाघाचा हा राजाशाही थाट पाहून नागरिक भारावून गेले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या घटनेमुळे परिसरात वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना सतर्क राहावे, असे आवाहन निसर्गप्रेमींकडून केले जात आहे.
30 Dec 2025, 07:15 वाजता
भंडाऱ्यातील तमन्ना बारमध्ये धाड… घरगुती सिलिंडरचा काळाबाजार उघड
भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापूर रोडवरील तमन्ना बार अँड रेस्टॉरंटवर धाड टाकून दोन एचपी घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण 5414 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून, हॉटेल मालकांसह तीन जणांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
30 Dec 2025, 07:14 वाजता
भांडुप रेल्वे स्थानकावर बेस्ट बसचा अपघात…
भांडुप रेल्वे स्थानकावर बेस्ट बस च्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले आहेत रात्री 9.30 च्या दरम्यान हा अपघात घडला हे 606 क्रमांकाची बेस्ट बस यू टर्न घेत असताना अचानक हे बस प्रवाशांच्या रांगेत शिरली यावेळी रस्त्यावरील प्रवासी हे बस खाली चिडले गेले बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
30 Dec 2025, 06:56 वाजता
राष्ट्रवादी (SP) च्या मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्षपद मिलिंद कांबळे
राष्ट्रवादी (शरद पवार) च्या मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्षपदी मिलिंद कांबळे आणि सहअध्यक्षपदी सोहेल सुभेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी सोमवारी ही नियुक्ती जाहीर केली. राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कांबळे आणि सुभेदार यांच्यावर मुंबईची जबाबदारी देण्यात आली. ‘लोकमत’शी बोलताना मिलिंद कांबळे म्हणाले, “ऐन निवडणुकीत पक्ष सोडण्याचा राखी जाधव यांचा निर्णय वाईट आहे. आमच्यावर नेतृत्वाने जी जबाबदारी टाकली आहे ती पार पाडू.
30 Dec 2025, 06:55 वाजता
महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केला आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली पत्रकार परिषदेपूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांची एक मोठी मॅरेथॉन बैठक पार पडली या बैठकीत जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली असून जागावाटप करत असताना प्रत्येक पक्षाला आपला कार्यकर्ता महानगरपालिकेत गेला पाहिजे याचा अट्टाहास असतो मात्र आमची सर्व चर्चा सकारात्मक होत आहे त्यामुळे महाविकास आघाडी एक विचाराने निवडणूक लढवणार असल्याचं खासदार लंके यांनी सांगितलं
30 Dec 2025, 06:53 वाजता
अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
महापालिका निवडणक अर्ज दाखल करण्यसाठी उद्या शेवटचा दिवस, निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी उसळण्याची शक्यता,अद्याप राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत.

30 Dec 2025, 06:52 वाजता
महायुतीचं ठरलं
नवी मुंबई, मीरा भाईंदर सोडून, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, महायुती म्हणून लढणार.मात्र नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर मध्ये युती होण्याच्या आशा धूसर,मुंबईतील ही काही जागांवरती महायुतीत मोठी रस्सीखेच,दोन्ही पक्षाने अजून पर्यंत अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही,त्यामुळे इच्छुकांची नंदनवन इथं मोठ्या प्रमाणात गर्दी.
30 Dec 2025, 06:51 वाजता
शिवसेनेची मुंबईतील उमेदवार यादी कधी येणार?
भाजपच्या यादीनंतर सेनेच्या यादीची प्रतीक्षा,रात्री उशिरा यादी येणार असल्याची माहीती,मुंबईत महायुतीचा मुख्य घटकपक्ष असलेल्या भाजपनं उमेदवार जाहीर केले. मात्र शिवसेनेला अजूनही उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत. शिवसेनेनं भाजपसोबत जागावाटप करताना खूपच घासाघिस केलीय. एवढी घासाघिस करुनही शिवसेनेला समाधानकारक जागा मिळताना दिसत नसल्याचं शिवसेनेतल्या सूत्रांचं म्हणणं आहे. त्यात शिवसेनेची यादी जाहीर होण्यास उशीर होतोय.सूत्रांच्या माहितीनुसार आज रात्री उशिरा शिवसेनेची यादी जाहीर होईल. या यादीत शिवसेनेचे उमेदवार कोण कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.



