टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जय पवार वडिलांच्या आठवणीने व्याकूळ, पोस्ट करत सांगितली ती मनातली गोष्ट

Follow Us:

Jay Pawar: तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील.”, असे जय पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar and Jay Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज नऊ दिवस उलटून गेले. मात्र अद्यापही त्यांच्या अपघाती निधनानं राज्य अद्याप सावरलेलं नाही, या नऊ दिवसांच्या काळात राज्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) राजकीय घडामोडी घडल्या, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्याचबरोबर त्यांच्यावर पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून जबाबदारी आली. या दु:खातून सावरत असतानाच आता अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांची एक सोशल मिडीयावरील पोस्ट व्हायरल होत आहे. जय पवार (Jay Pawar) यांनी आपल्या फेसबुकवरून फोटो शेअर केला आहे, वडिलांसोबत बोलतानाचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. यासोबत जय पवार यांनी काही मजकूरही लिहला आहे. यामध्ये म्हटले आहे की, “Dad माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील.”, असे जय पवार यांनी म्हटले आहे. जय पवार यांची ही पोस्ट पाहून कार्यकर्ते, नेते आणि नागरिक भावूक झाले आहेत.(Jay Pawar shared memory)

बारामतीत विमान लॅंड होत असताना अपघात

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी मुंबईवरून बारामती येथे येत असताना 28 जानेवारीला त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. विमान लँड होत असतानाच विमान अपघात झाला, विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यानंतर विमानाचा प्रचंड स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर मोठा आघात झाला होता. 29 जानेवारीला अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. अजित पवार यांच्याकडील उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांच्या मंत्रि‍पदीही सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड पुढल्या एक महिन्याच्या आधी करण्याच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थसंकल्प अधिवेशन कालावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवडणूक पार्टी अंतर्गत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, पार्टीचे पत्र राज्यातील पदाधिकारी तसंच राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या सहमतीने सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य