Iran Israel War: अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले सुरूच आहेत.
Iran Israel War: अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये (Iran Israel War) सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत इराणमध्ये किमान 1350 लोक मारले गेले आहेत आणि 17,000 हून अधिक जखमी झाले आहेत, ज्यात 1100 मुले आहेत. दरम्यान, इस्रायलने लेबनॉनवर आपले हल्ले तीव्र केले आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत 687 लोकांचा मृत्यू झाला आहे.
UNHCR नुसार, इराणमध्ये सव्वा तीन लाख लोक विस्थापित होतील. अमेरिकेने पहिल्यांदाच इराणविरुद्ध 15 टन वजनाचे बॉम्ब देखील वापरले आहेत. दरम्यान, इराणी क्षेपणास्त्रांनी तेल अवीव, हैफा, बेत शेमेश आणि बेरशेबासह अनेक इस्रायली शहरांना लक्ष्य केले आहे, ज्यामध्ये 14 ते 15 लोकांचा मृत्यू आणि हजारो जखमी झालेत. तर तेल अवीवच्या आसपासच्या भागातही अनेक जणांचा मृत्यू झाला. IRGC ने इराकमध्ये अमेरिकन तेल टँकरवर समुद्री ड्रोन हल्ला केला. (Iran Israel War)

होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार- मोजतबा खामेनी (Iran Israel War)
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी मोठं वक्तव्य केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार असल्यचं त्यांनी ठणकावून सांगितलंय. तसंच शत्रूचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सर्व जनतेनं एकजूटीनं उभे राहण्यासाठी आवाहन केलं आहे. मिनाबमधील शाळेतील निष्पापांच्या बळींचा बदला घेतल्याशिवाय इराण शांत राहणार नाही असा इशाराही खामेनींनी दिला आहे. तर मोजतबा यांनी इराणी लोकांना या वर्षीच्या कुद्स दिनाच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी होऊन शत्रूला इराणची ताकद दाखवा असं आवाहन केलंय. दरम्यान अमेरिकविरुद्धच्या संघर्षात इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्ध थांबवण्यासाठी 3 महत्त्वाच्या अटी ठेवल्यात. इराणच्या अटी पूर्ण झाल्यासच युद्ध थांबवण्याबाबत पुढील पावले उचलली जाऊ शकतात असं राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलंय.
इराणच्या 3 अटी कोणत्या? (What are Iran three conditions?)
- तेहरानच्या कायदेशीर हक्कांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
- युद्धामुळे झालेल्या नुकसानाबद्दल इराणला आर्थिक भरपाई
- भविष्यात इराणवर कोणताही हल्ला होणार नाही, याविषयी ठोस हमी
युद्धामुळे संपूर्ण जगावर संकट आहे. तरीही भारतावर सर्व जगाच्या नजरा- नरेंद्र मोदी (Narendra Modi On Iran Israel War)
आखातात सुरू असलेल्या युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाचं भाष्य केलं. युद्धामुळे संपूर्ण जगावर संकट आहे. तरीही भारतावर सर्व जगाच्या नजरा आहेत. त्यामुळे या कठीण काळात शांती आणि धैर्याने आपल्याला परिस्थितीचा सामना करावा लागेल, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. एलपीजीच्या पुरवठ्यावर काही लोक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय, असं असलं तरी कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
जगात हाहाकार! इराणची हादरवणारी धमकी, थेट म्हटले, काहीही झाले तरीही…
Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ सिनेमातील बडे साहब नक्की कोण? मोठं सत्य अखेर समोर आलंच









