टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

India Squad VS SA Tour : अनुष्का शर्माची टीम इंडियात पहिल्यांदाच निवड! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी BCCIकडून टीमची घोषणा

Follow Us:

India Squad For South Africa Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे.

India Squad For South Africa Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची (India Squad For South Africa Tour) घोषणा केली आहे. हा दौरा पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा असून 17 एप्रिल ते 27 एप्रिलदरम्यान सामने खेळले जाणार आहेत. संघाची धुरा पुन्हा एकदा अनुभवी अष्टपैलू हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर स्टार स्मृती मानधना हिला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अनुभव आणि युवा खेळाडूंचा उत्तम समतोल असलेला हा संघ दक्षिण आफ्रिकेत दमदार कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

अनुष्का शर्माला पहिली संधी

या संघातील सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे युवा खेळाडू अनुष्का शर्मा, तिला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तिने नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीग मध्ये गुजरात जायंट्स कडून खेळताना प्रभावी कामगिरी केली. सात डावांत 177 धावा करताना तिचा स्ट्राइक रेट 129.19 राहिला, तर 44 धावा हा तिचा सर्वोच्च स्कोर होता. या शानदार कामगिरीचे फळ तिला राष्ट्रीय संघातील निवडीच्या रूपाने मिळाले.

शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स अन् टीम इंडियाची तगडी फलंदाजी

भारतीय संघाची फलंदाजी खूपच संतुलित दिसते. शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांसारख्या विश्वासार्ह खेळाडूंमुळे संघाला भक्कम आधार मिळणार आहे. यष्टिरक्षणाची जबाबदारी ऋचा घोष आणि उमा छेत्री सांभाळणार असून त्यामुळे संघाला अधिक खोली मिळेल.

गोलंदाजीमध्ये अनुभव अन् युवा जोश

फिरकी विभागात श्रेयांका पाटील, श्री चरणी आणि अनुभवी दीप्ती शर्मा यांचे त्रिकूट प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी आणि क्रांती गौड यांच्यावर असेल.

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा वेळापत्रक

वार दिनांक वेळ (भारतीय प्रमाणवेळ) ठिकाण
शुक्रवार 17-एप्रिल-2026 9:30 रात्री डर्बन
रविवार 19-एप्रिल-2026 5:30 संध्याकाळी डर्बन
बुधवार 22-एप्रिल-2026 9:30 रात्री जोहान्सबर्ग
शनिवार 25-एप्रिल-2026 9:30 रात्री जोहान्सबर्ग
सोमवार 27-एप्रिल-2026 5:30 संध्याकाळी बेनोनी

भारतीय महिला संघ (India Squad For South Africa Tour) :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रीचरणी, श्रेयंका पाटील, काशवी गौतम, भारती फुलमाळी, उमा छेत्री (विकेटकीपर), अनुष्का शर्मा.

हे ही वाचा –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now