लाहोर , 13 फेब्रुवारी (हिं.स.)।चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानमध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात ट्राय सिरीज सूरू आहे. या ट्राय सिरीजमध्ये बुधवारी (१२ फेब्रुवारी ) खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानमधल्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजासोबत लाईव्ह सामन्यात वाद केला. या भांडणाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानमधल्या सामन्यात शाहीन आफ्रिदी गोलंदाजी करत होता. आणि स्ट्राईकवर साऊथ आफ्रिकेचा मॅथ्यू ब्रिट्झकेने फलंदाजी करत होता. यावेळी मॅथ्यूने बॉल खेळल्यानंतर धावा घेताना बॅट फेकून मारल्याची अॅक्शन केली.या अॅक्शनवर शाहिन आफ्रीदी चांगलाच भडकला आणि त्याला सुनावले.त्यानंतर मॅथ्यू शाहिन आफ्रीदिचा दुसरा बॉल लेग साईडवर हळूवारपणे खेळला आणि त्याने एक धाव पूर्ण केली. ही धावा पुर्ण करताना शाहीनने पाय टाकून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मॅथ्यू जमीनीवर कोसळता कोसळला राहिला.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानमधल्या सामन्यात दोन खेळाडू एकमेकांना भिडले
त्यानंतर शाहिनने पुन्हा नॉन स्ट्राईकवर जाऊन त्यांच्याशी वाद घातला.यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये तुफान बाचाबाची झाली.त्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू आणि अंपायर यांनी मद्यस्थी केली आणि हा वाद मिटवला. भांडण सोडवण्याच्या बहाण्याने खुसदिल शाहने ब्रीट्झकेला मैदानाच्या मध्यभागी ढकलले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खुसदिल हस्तक्षेप करण्याच्या बहाण्याने ब्रीट्झकेला ढकलताना स्पष्टपणे दिसत आहे.सामन्यादरम्यान, विरोधी संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा यांनीही या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की तो खुसदिल शाहच्या वृत्तीवर फारसा खूश नव्हता आणि त्याच्यावर टीका करत होता. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
—————