वजन कमी करायचे आहे, तर रात्री डीनरमधून हे 5 पदार्थ वगळा, अन्यथा वजन घटणे अशक्य

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणात काही पदार्थ टाळणे महत्वाचे असते. लोक अनेकदा नाश्ता नीट करत नाहीत आणि रात्री जास्त खातात, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. डीनरमधील काही पदार्थ शरीरात चरबी वाढवतात, पचन बिघडवू शकतात आणि झोपेत व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे वजन कमी करणे खूपच कठीण होते.

वजन कमी करायचे आहे, तर रात्री डीनरमधून हे 5 पदार्थ वगळा, अन्यथा वजन घटणे अशक्य

बैठ्या जीवनशैली आणि व्यायाम न केल्याने लठ्ठपणाची समस्या वाढली आहे.अनेकजण सकाळचा ब्रेकफास्ट स्कीप करण्याची चूक करतात. रात्रीचा जेवण भरपेठ करतात त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होत असते. वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी काय खावे आणि किती खावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रात्रीचा जड आहार घेतल्यास पचन नीट होत नाही. त्यामुळे पचन यंत्रणा खराब होते आणि झोपेचे देखील वांदे होतात.चला तर रात्रीचा आहारात काय घ्यावे काय टाळावे हे पाहूयात…

वजन कमी करायचे असेल तर रात्रीचा आहार तुम्ही किती वाजता घेता आणि कोणता आहार घेता हे महत्वाचे असते. तुम्ही रात्रीचा आहार चुकीचा घेतला तर त्यानंतर जिममध्ये तासनतास मेहनत घेऊन घाम गाळला तरी वजन कमी होत नाही. तुमच्या डीनरमध्ये जर पचायला जड असणारे पदार्थ असतील तर तुमचे वजन कमी होणार नाही.

पांढरा भात आणि रिफाइंड कार्ब्स

भारतीय घरात रात्रीचा डाळ – भात खाणे कॉमन असते. परंतू पांढऱ्या भारतात सिंपल कार्बोहाइड्रेट्स आणि हाय ग्लाइसेमिक इंडेक्स असतो. रात्री भात खाल्ल्याने वेगाने ब्लड शुगर वेगाने वाढते.ज्यामुळे फॅट स्टोरेज वाढत असते. जर तुम्ही भाताशिवाय राहू शकत नाही, तर भाताचे प्रमाण कमी करु शकता.

तळलेले आणि तिखट पदार्थ

रात्रीच्या वेळी समोसे, भजी वा पुरी-कचोरी सारखे तळलेले पदार्थ खाल्ल्यास शरीराला ते पचवणे कठीण जाते. यात सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. डिनरमध्ये तेलकट पदार्थांचा समावेश केल्याने केवळ वजनच वाढते असे नाही तर एसिडिटी आणि झोपेचे देखील पार खोबरे होते.

गोड पदार्थ आणि डेझर्ट

डीनरनंतर गोड खाण्याची सवय अनेक लोकांना असते. परंतू रात्रीच्या वेळी साखर खाल्ल्याने इन्सुलिन लेव्हल वाढते. कारण रात्री आपण कॅलरी बर्न करत नाही. त्यामुळे एक्स्ट्रा साखर थेट पोटात चरबीच्या रुपात जमा होते. जर गोड खाण्याचे मन करत असेल कर गुळाचा छोटासा तुकडा वा थोडाशी फळे खाऊ शकता.

कॅफीन आणि सॉफ्ट ड्रिंक्स

रात्रीच्या जेवणासोबत कोल्ड ड्रींक्स, सोडा वा कॉफी पिण्याच्या सवयीमुळे वजन कमी करण्यात अडसर निर्माण होतो. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये लिक्विड कॅलरीज आणि शुगर खूप जास्त असते. तसेच कॅफीन तुमचे स्लीप सायकल बिघाडू शकते. रात्रीची झोप नीट येत नसेल तर थेट तुमचे वजन वाढू शकते आणि तणावात भर पडू शकते.

मैदा आणि फास्ट फूड

पिझ्झा, पास्ता, नूडल्स सारखे पदार्थ किंवा मैद्यापासून तयार झालेल्या रोठी डिनरमध्ये खाल्ल्यास वजन घटवणे अवघड बनते. मैद्यात फायबर नसते आणि पोट जड वाटू लागते. मैदा मेटाबॉलिझ्मचा वेग कमी करतो, त्यामुळे कॅलरी बर्न करणे अवघड होते.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon