संजय राऊत प्रयागराजला गेले तर गंगा घाण होईल – शहाजीबापू पाटील

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
संजय राऊत प्रयागराजला गेले तर गंगा घाण होईल - शहाजीबापू पाटील

सोलापूर, 25 फेब्रुवारी

संजय राऊतांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची माती केली आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बसवण्यास उद्धव साहेबांना भाग पाडल्याचे पाडल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले. संजय राऊतांना प्रयागराजला जाऊ देऊ नका, अन्यथा तो गंगा घाण होईल असा टोलाही पाटील यांनी लगावला. त्यांना त्या नारळाच्या झाडाखालीच बसू द्या असेही पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना कोणीही धक्का दिलेला नसून त्यांची वर्तणूकच त्यांना धक्का देत आहे असे शहाजीबापू पाटील म्हणाले. अजूनही त्यांनी विचार करावा आणि खऱ्या शिवसेनेत यावे असे निमंत्रण शहाजी बापू पाटील यांनी दिले. निलम गोऱ्हे या अनेक वर्ष शिवसेनेत राहिल्या असून त्यांना तिथली कार्यपद्धती चांगली माहित आहे. त्यामुळं त्यांनी केलेल्या आरोपात नक्कीच तथ्य आहे.

शिवसेनेत तिकीट कशी दिली जायची? हे सर्व जगाला माहित आहे. मला तिकीट देताना काही मागायचे धाडस यांच्यात नव्हते. त्यामुळे मला कोणी याबाबत बोलले नसावे असा खुलासा शहाजी बापू पाटील यांनी करताना निलम गोऱ्हे यांच्या आरोपात तथ्य असल्याचे पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आणकी आत्मचिंतन करावे, त्यांनी शिवसेनेत यावे असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

इथे हि वाचा 

Rain Alert : 3 मार्च पर्यंत पावसाचा अलर्ट, कुठे-कुठे कोसळणार सरी ? महाराष्ट्रात स्थिती काय ?

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर…

Devendra Fadnavis On Neelam Gorhe: देवेंद्र फडणवीसांनी नीलम गोऱ्हेंचे टोचले कान; म्हणाले, साहित्य संमेलनात बोलताना काही…

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon