वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान कोसळले

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

पॅराशूटच्या मदतीने वैमानिकाने वाचवला जीव

चंदीगड, 07 मार्च (हिं.स.) : हरियाणातील पंचकुला येथील मोरनी येथील बलदवाला गावाजवळ आज, शुक्रवारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. विमानाने अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षण उड्डाणासाठी उड्डाण केले होते. अपघातानंतर वैमानिकाने पॅराशूटच्या साहाय्याने आपला जीव वाचवला.

यासंदर्भात वायुसेनेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणार्थी विमानाने हरियाणाच्या पंचकुला विमानतळाहून उड्डाण केल्यानंतर त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हा अपघात घडला. विमानातील बिघाडाची कल्पना येताच वैमानिकाने समयसूचकता दाखवत हे विमान नागरी वस्तीपासून लांब नेले आणि स्वतः देखील पॅराशूटच्या मदतीने विमानातून बाहेर उडी घेतली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमान डोलणाऱ्या झाडांवर आदळले आणि जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका खड्ड्यात पडले.

विमान पडताच त्याला आग लागली आणि त्याचे अनेक तुकडे झाले. विमानाचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात विखुरलेले आढळले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परिसर सील करण्यात आला आहे आणि मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्य सरकार हे औरंगजेबाच्या विचाराने चालणारे सरकार – हर्षवर्धन सपकाळ

बांगलादेशी घुसखोर : बनावट आधारकार्ड काढून सोलापुरात मजुरी

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon