Hutatma Smruti Day: आज सकाळी 11 ते 11.02 वाजेपर्यंत मौन पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे गंभीरपणे पालन करण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहे.

Hutatma Smruti Day: आज सकाळी 11 वाजता सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये स्तब्ध होणार आहेत. आज हुतात्मा दिन असल्यामुळे 2 मिनिटे मौन पाळण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली देण्यासाठी सरकारचे आदेश दिले आहेत. आज सकाळी 11 ते 11.02 वाजेपर्यंत मौन पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे गंभीरपणे पालन करण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहे. (Hutatma Smruti Day)
कशी द्यायची आदरांजली? (Hutatma Smruti Day)
- आज सकाळी 10.59 ते 11 दरम्यान एक मिनिट इशारा भोंगा वाजवण्यात येईल.
- इशारा भोंगा संपल्यावर सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय व संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक हे 2 मिनिटे मौन पाळतील.
- सकाळी 11.02 ते 11.03 वाजेपर्यंत मौन संपल्यासंबंधी इशारा भोंगा वाजवावा.
- ज्याठिकाणी भोंगा नसेल, त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्देश द्यावेत.
राज्य सरकारच्या आदेशात नेमकं काय काय? (Hutatma Smruti Day)
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक 30 जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार यावर्षीही शुक्रवार, दिनांक 30 जानेवारी, 2026 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा. शुक्रवार, दिनांक 30 जानेवारी, 2026 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता पाळण्यात यावयाच्या मौन (स्तब्धता) ची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी ठिक 10.59 पासून 11.00 वाजेपर्यन्त इशारा भोंगा वाजविण्यात येईल. सदर इशारा भोगा संपल्यानंतर सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/आस्थापना/शैक्षणिक संस्था/विद्यापीठे या मधील अधिकारी/कर्मचारी/ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी / विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे, सकाळी ठिक 11.02 मिनिटांनी मौन (स्तब्धता) संपल्यासंबंधीचा इशारा भोंगा सकाळी ठिक 11.03 मिनिटांपर्यन्त वाजविण्यात येईल. जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे सकाळी ठिक 11.00 वाजता मौन (स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते निदेश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता) पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६०१२९१२५९०५३००७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
संबंधित बातम्या




