टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला येथे ट्रक-दुचाकी भीषण अपघातात पती-पत्नी ठार

सांगोला – पंढरपूर रोडवरील घटना : दोन तास वाहतूक ठप्प

सांगोला : भंगार वाहतूक करणाऱ्या मालट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात भंगाराखाली सापडून पतीचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरून उडून रस्त्यावर खाली पडून पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या ट्रक चालकावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास सांगोला – पंढरपूर रोडवर देशमुख वस्ती येथे झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रक रोडच्या डाव्या बाजूला पलटी होऊन खाली सापडलेली दुचाकी ५० फूट फरफटत गेली अन् दुचाकीस्वार चिरडून जागीच मरण पावला.

रामचंद्र बनसोडे (वय ५८), लक्ष्मीबाई बनसोडे (वय ५०), दोघेही रा. बामणी, ता. सांगोला अशी मृतांची नावे आहेत. सांगोला येथील एका अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक तानाजी बनसोडे यांचे ते आई-वडील होते.

बनसोडे दांपत्य रविवारी सकाळी १० च्या सुमारास दुचाकी वरून कमलापूर (गोडसेवाडी) येथील नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. लग्न समारंभानंतर दुचाकीवरून सांगोला-बामणी घराकडे निघाले होते.

🔥🌞😎*समर धमाका ऑफर*
*टायटन एका चष्म्यावर एक चष्मा फ्री**
(1990/-रुपयांपासून चक्क दोन चष्मे)

🔥फास्टट्रॅक 2 सनग्लासेस खरेदीवर दुसऱ्या सनग्लासवर मिळवा 50% डिस्काउंट*

✅100% अचूक मोफत नेत्र तपासणी
✅100% सुस्पष्टता
✅टाटाचा विश्वास
✅नेत्र तपासणीसाठी उच्च-शिक्षित तज्ञ

*टायटन वर्ल्ड | टायटन आय+*
बाटा शोरूम जवळ,भोपळे रोड,सांगोला
संपर्क – 7507 995 995

फॉलो नक्की करा
📷instagram.com/titanworld_sangola

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now