टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Highways Toll Hike: आजपासून हायवेवरील प्रवास महागला; टोलमध्ये मोठी वाढ, महत्त्वाच्या टोलनाक्यांवरील दराची यादी

टोलमध्ये मोठी वाढ

Toll Rate Hike: एखाद्या वाहनाचा ‘फास्टॅग’ वैध नसेल, तर रोख दुप्पट पैसे द्यावे लागतील. मात्र, ‘यूपीआय’द्वारे पेमेंट केल्यास दंडाची रक्कम सव्वा पट द्यावी लागेल.

आजपासून टोल प्लाझा कॅशलेस; वाहनचालकांना फक्त फास्टॅग, यूपीआयद्वारे टोल  टॅक्स भरता येणार, टोल 5 टक्क्यांनी महागला | Saamana (सामना)

पुणे: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) एक एप्रिलपासून टोल दरांत तीन टक्के वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे; तसेच राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली पूर्णपणे कॅशलेस पद्धतीने करण्यात येणार आहे. पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक महामार्गावरील टोलनाक्यांवर हे वाढीव दर लागू होतील. त्यामुळे या महामार्गांवरील प्रवास महागणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये प्रत्येक वर्षी तीन टक्के दरवाढ केली जाते. त्यानुसार ‘एनएचएआय’ने सर्व टोलमध्ये एक एप्रिलपासून वाढ लागू केली आहे. यामुळे प्रवास महागणार आहे; तसेच एक एप्रिलपासून आता टोलवर रोखीने पैसे स्वीकारले जाणारच नाही. त्यामुळे वाहन चालकांना ‘फास्टॅग’ सुरू आहे का, हे अगोदर तपासूनच प्रवास करावा लागणार आहे.

असा आहे कॅशलेसचा नियम

राष्ट्रीय महामार्गावर टोल व्यवहार पूर्णपणे कॅशलेस करण्याचा निर्णय ‘एनएचएआय’ने घेतला आहे. ‘फास्टॅग’ आणि ‘यूपीआय’द्वारेच टोलची रक्कम आकारली जाणार आहे. टोलवरील व्यवहार पारदर्शक आणि वेगवान होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

नवीन टोल रक्कम

१. आनेवाडी टोलनाका

वाहन प्रकार: कार/जीप/व्हॅन – एकेरी प्रवास ८५, परतीचा प्रवास १३०
वाहन प्रकार: हलकी व्यवसायिक वाहने – एकेरी प्रवास १४०, परतीचा प्रवास २१०
वाहन प्रकार: बस/ट्रक – एकेरी प्रवास २९५, परतीचा प्रवास ४४५
वाहन प्रकार: जड वाहन – एकेरी प्रवास ४६५, परतीचा प्रवास ६९५
वाहन प्रकार: मोठी अवजड वाहने – एकेरी प्रवास ५६५, परतीचा प्रवास ८४५

२. इंदापूर टोलनाका

वाहन प्रकार: कार/जीप/व्हॅन – एकेरी प्रवास ७५, परतीचा प्रवास ११०
वाहन प्रकार: हलकी व्यवसायिक वाहने – एकेरी प्रवास १२०, परतीचा प्रवास १८०
वाहन प्रकार: बस/ट्रक – एकेरी प्रवास २५०, परतीचा प्रवास ३७५
वाहन प्रकार: जड वाहन – एकेरी प्रवास २७५, परतीचा प्रवास ४१०
वाहन प्रकार: मोठी अवजड वाहने – एकेरी प्रवास ४७५, परतीचा प्रवास ६१५

३. खेड शिवापूर टोलनाका

वाहन प्रकार: कार/जीप/व्हॅन – एकेरी प्रवास १२५, परतीचा प्रवास १९०
वाहन प्रकार: हलकी व्यवसायिक वाहने – एकेरी प्रवास २०५, परतीचा प्रवास ३०५
वाहन प्रकार: बस/ट्रक – एकेरी प्रवास ४२५, परतीचा प्रवास ६४०
वाहन प्रकार: जड वाहन – एकेरी प्रवास ६६५, परतीचा प्रवास १०००
वाहन प्रकार: मोठी अवजड वाहने – एकेरी प्रवास ८१०, परतीचा प्रवास १२२०

४. चाळकवाडी टोलनाका

वाहन प्रकार: कार/जीप/व्हॅन – एकेरी प्रवास १३५, परतीचा प्रवास २००
वाहन प्रकार: हलकी व्यवसायिक वाहने – एकेरी प्रवास २१५, परतीचा प्रवास ३२५
वाहन प्रकार: बस/ट्रक – एकेरी प्रवास ४५०, परतीचा प्रवास ६७५
वाहन प्रकार: जड वाहन – एकेरी प्रवास ४९५, परतीचा प्रवास ७४०
वाहन प्रकार: मोठी अवजड वाहने – एकेरी प्रवास ८६०, परतीचा प्रवास १२९५

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा