मे महिन्यात पावसाचा उच्चांक, देशभरात या काळात 42 टक्के जास्त पाऊस

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Maharashtra Weather Forecast : देशात मे महिन्यातील पावसाने विक्रम केला आहे. देशभरात मे महिन्यात ४२ टक्के जास्त पाऊस झाला आहे. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार राज्यात मे महिन्यातील पावसाची सरासरी १४.४ टक्के आहे. परंतु, यंदा १५९.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

Maharashtra Weather Forecast : राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मे महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यंदा मान्सूनने विक्रम केला. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. तसेच मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नवीन उच्चांक निर्माण झाला आहे. मे महिन्यात विक्रमी १५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरी पेक्षा ११ पट जास्त आहे. मे महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भर उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर आला. धरणांमध्ये जलसाठा वाढला आणि धबधबे वाहू लागले. देशभरातील मार्च ते मे या तीन महिन्याची सरासरी पहिल्यास ४२ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मे महिन्यात बदल दिसून आला.या दोन्ही समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. यामुळे महाराष्ट्रासह देशभरामध्ये दमदार पाऊस झाला. मे महिन्यात कडक ऊन असते. तापमान वाढलेले असते. राज्यातील अनेक शहरांमध्ये ४० अंशाच्या वर तापमान असते. परंतु यंदा मे महिन्यात कमाल तापमानात मोठी घट झाली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळताना पावसाळ्याचा अनुभव आला.

१९०१ पासूनच्या नोंदीनुसार राज्यात मे महिन्यातील पावसाची सरासरी १४.४ टक्के आहे. परंतु, यंदा सरासरीपेक्षा ११ पट जास्त म्हणजे १५९.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे नवीनच विक्रमाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९१८ मध्ये मे महिन्यात ११३.६ मिलिमीटर पाऊस झाला होता.

पुढील चार दिवस कसे असणार वातावरण

हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये १ ते ४ जूनदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही या काळात पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon