Brazilian Model Larisa : कालच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ब्राझिलच्या मॉडेलने हरियाणा निवडणुकीत 1, 2 नाही तर 22 वेळा मतदान केल्याचा दावा केला होता. आता ती मॉडेलच समोर आली आहे. तिने या सर्व प्रकरणात मोठा दावा केला आहे.
Haryana Election Vote Theft Rahul Gandhi : ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणा विधानसभा निवडणुकीत एकदा नाही तर 22 वेळा मतदान केले. त्यातही तिचे नाव कधी स्वीटी तर कधी काही असल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी काल केला. काल त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला. भारतापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या या ब्राझिलच्या मॉडेलचे नाव लरिसा असे आहे. तिच्या नावाची चर्चा भारतातच नाही तर ब्राझीलपर्यंत पोहचली आहे. तिने आता या सर्व मुद्दावर तिचे भन्नाट उत्तर दिले आहे. काय आहे तिचा दावा?
ब्राझीलची मॉडेल लरिसाचे नाव राहुल गांधींना बहुधा ठाऊक नव्हते. त्यांनी तिचा फोटो दाखवत हरियाणातील 10 बुथवर तिचा फोटो वापरत 22 वेळा मतदान करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. प्रत्येक वेळी नावात बदल करण्यात आला. एकाच मॉडेलच्या फोटोवर विविध नावांआधारे 22 वेळा मतदान करण्यात आले. हरियाणात जे 25 लाख मत चोरी झाली, त्यात हा एक मोठा घोटाळा असल्याचा दावा राहुल गांधींनी काल केला होता. वोट चोरी, मत चोरी हे 5 श्रेणीत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात 5,21,619 बोगस मतदार आहे. 93,174 पत्ते बोगस आहेत. 19,26,351 एकगठ्ठा मतदार आहे. हा एक केंद्रीय कट असल्याचा आरोप काल त्यांनी केला होता.
लरिसा आली समोर, म्हणाली काय?
“हॅलो इंडिया, मला भारतीय पत्रकारांसाठी एक व्हिडिओ तयार करण्यास सांगण्यात आले. म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे. भारतीय राजकारणाशी माझा काडीचाही संबंध नाही. मी कधी भारतात आली नाही. मी ब्राझिलची मॉडेल आहे आणि डिजिटल इन्फूलएन्शनर आहे. मला भारतीय लोकांविषयी आदर आणि प्रेम आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. नमस्ते.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.
“मी तुम्हाला सांगू इच्छिते की, हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्याविषयी काही भारतीय पत्रकारांना माझी प्रतिक्रिया हवी होती. तर मग हा माझा व्हिडिओ आहे. काही भारतीय पत्रकार मला शोधत आहेत. माझी मुलाखत घेऊ इच्छित आहेत. मित्रांनो, मी सर्वांना मुलाखत दिली आहे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं ही दिली आहेत.” असे तिने स्पष्टपणे सांगितले.
संबंधित बातम्या
तुम्हाला वाटतं का मी भारतीयांसारखी दिसते?
तुम्हाला वाटतं का की मी भारतीयांसारखी दिसते? मला तर वाटतं मी मॅक्सिकन लोकांसारखी दिसते. पण मी भारतीयांचा दयाळूपणा, उदारपणाचे आभार मानते. ते माझ्याविषयी जाणून घेत आहेत. माझ्याविषयी अनेक लोक माहिती देत आहेत. अनुवाद करून ही माहिती भारतीय पत्रकारांपर्यंत पोहचवत आहेत. मीच ती रहस्यमय ब्राझिलियन मॉडेल आहे, जीची चर्चा सुरू आहे. पण मी तर सध्या लहान मुलांमध्येच रमते. आता तर मी मॉडेल सुद्धा नाही. त्यामुळे मी अधिक गुढ झाली आहे. माझ्या इन्स्टाग्राम खात्यावर भारतीयांचे स्वागत आहे. तो केवळ माझा फोटो आहे, मी तिथे नव्हते.” असा खुलासा तिने केला आहे.




