Maharashtra Rain Update : राज्यावर पावसाचे मोठे संकट आहे. फक्त राज्याच नाही तर देशावरही संकट आलंय. भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. पुढील 3 दिवस धोक्याची असणार आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस हजेरी लावताना दिसतोय. नोव्हेंबर महिना उजाडला असूनही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. फक्त राज्यातच नाही तर देशभरात पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला, शेतकर्यांचं मोठं नुकसान झाले. शासनाच्या मदतीची वाट शेतकरी अजूनही बघत आहेत. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. पुणे, सांगली आणि साताऱ्यामध्ये ढगाळ वातावरण असेल. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. मोंथा चक्रीवादळानंतर अजून एका चक्रीवादळाचा इशारा सध्या देण्यात आला. यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असेल.
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच देशातील हवामानात लक्षणीय बदल होतोय. भारतीय हवामान विभागाने (IMD) एक इशारा जारी केला आहे की, पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस आणि वादळे येऊ शकते. 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील तब्बल इतक्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
रत्नागिरी, सांगली, सातारा, आहिल्यानगर, पुणे या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. बीड, नांदेड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि विजांचा कडकडाटासह पाऊस होईल. राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याचे संकेत आहेत. यादरम्यान वारेही वेगाने वाहून लागेल.
संबंधित बातम्या
8 नोव्हेंबरपर्यंत देशावर संकट कायम
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारपासून सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभाचा उत्तर प्रदेशवर सौम्य परिणाम होऊ शकतो. बहुतेक ठिकाणी पावसाची अपेक्षा नाही. मध्य आणि पश्चिम भारतात हवामान बदल दिसून येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पूर्व मध्य प्रदेशात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात 5 ते 6 नोव्हेंबर दरम्यान वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.



