सांगोला (प्रतिनिधी):- श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी खारवटवाडी येथील सुप्रसिद्ध अमृतेश्वर महादेव मंदिरात सामाजिक कार्यकर्ते रमेशआण्णा देशपांडे यांनी मंदिराला एक सुंदर हार्मोनियम पेटी भेट दिली.
श्रावण सोमवार निमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. याच मंगलदिनी रमेशआण्णा देशपांडे यांनी मंदिरासाठी हार्मोनियम अर्पण केली. या हार्मोनियममुळे मंदिरात होणार्या भजन-कीर्तनांना आणि धार्मिक कार्यक्रमांना अधिक गोडवा येणार आहे, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
यावेळी शरणाप्पा हळ्ळीसागर, राजाराम खडतरे महाराज, श्रीकांत डबीर, शशिकांतदादा लाटणे, अॅड.विशाल बेले, बापू ढोले, प्रकाश महाजन यांच्यासह भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.