टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Harish Rana Video: आता जा, बाळा…शांत जा…, हरीश राणाच्या इच्छामरणाची तयारी सुरु, शेवटच्या व्हिडीओने संपूर्ण देश हळहळला!

Follow Us:

Harish Rana Video: सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी दिल्यानंतर आता कुटुंबीयांनी त्याला दिल्लीतील एम्समध्ये घेऊन गेले.

Harish Rana Video: सर्वोच्च न्यायालयाने 32 वर्षीय हरीश राणा (Harish Rana) यांच्या बाबतीत ‘निष्क्रिय इच्छामरणाची’ (Passive Euthanasia) परवानगी दिली आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेतील हा एक अत्यंत ऐतिहासिक आणि संवेदनशील निकाल मानला जात आहे. न्यायमूर्ती  जे. बी. पारडीवाला आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निकाल  दिला. निकाल देताना न्यायमूर्तीही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी दिल्यानंतर आता कुटुंबीयांनी त्याला दिल्लीतील एम्समध्ये घेऊन गेले. त्यानंतर  हरीश राणाचे ‘लाईफ सपोर्ट सिस्टीम’ आता काढून टाकण्यात आले आहे. हरीश राणाला या जगातून निरोप देण्याची तयारी सुरू आहे. या संदर्भातील एक अत्यंत भावूक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरीश राणाचा हा व्हिडीओ पाहून संपूर्ण देश हळहळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हरीश राणाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय? (Harish RanaViral Video)

हरीश राणा बेडवर झोपलेला आहे. यावेळी एक महिला त्याच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावून डोक्यावरुन हात फिरवते. सर्वांना माफ कर…सर्वांची माफी मागत जा…आता जा बाळा…शांत जा…असं सदर महिला हरीशला बोलताना दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय? (Harish Rana Case)

हरीश राणा  2013 मध्ये चंदीगडमध्ये विद्यार्थी असताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून  पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली आणि तो गेली 13  वर्षे व्हेजिटेटिव्ह स्टेट (Vegetative State) मध्ये होता. हरीश गेल्या 13 वर्षांपासून कोमात होता. त्याच्या डोक्यातील नसाही सुकल्या होत्या. आपल्या मुलाला या अवस्थेत पाहू न शकल्यामुळे त्याच्या वृद्ध पालकांनी त्याचे ‘लाइफ सपोर्ट’ (Life support) काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती केली होती. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली  होती, परंतु त्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली ही  भारतातील पहिलीच घटना ठरली आहे.

न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले? (Harish Rana Case)

एखाद्या मुलाला अनंत काळापर्यंत अशा स्थितीमध्ये ठेवू शकत नाही, असे  निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयाला हरीशला दाखल करून घेण्याचे आणि वैद्यकीय देखरेखीखाली त्याचे लाईफ सपोर्ट टप्प्याटप्प्याने काढण्याचे  निर्देश दिले आहेत. हा निकाल देताना न्यायालयाने हरीशच्या पालकांच्या 13 वर्षांच्या धैर्याचे आणि समर्पणाचेही कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Gold And Silver Price: सोने-चांदीची स्वस्ताईची गुढी! गुढीपाडव्याला किंमती इतक्या झाल्या कमी, ग्राहकांचा आनंद गगनात मावेना

Pimpri Chinchwad Accident: काळाचा घाला! लेह-लडाखवरून परतताना पिंपरीतील 3 मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; 30 फूट खोल दरीत कार कोसळून मृत्यू

जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, आता 200 दिवसांपर्यंत…

Raj Thackeray: राज ठाकरेंची आज डरकाळी, ठाकरे बंधुंच्या युतीनंतर मनसेच्या मेळाव्यात टार्गेटवर कोण कोण?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता केव्हा? आली की आनंदवार्ता, या दिवशी खात्यात जमा होणार पैसा

Dharashiv Rain and Hailstorm: धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील