गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आजदेखील सोन्याचा भाव धडाम् घसरला आहे. त्यामुळे आगामी काळातही सोन्याचा भाव असाच कमी होणार का? असे विचारले जात आहे.
Gold And Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोने तसेच चांदीचे भाव कधी वाढताना दिसत आहेत तर कधी झटक्यात भाव खाली घसरताना दिसतोय. दिवाळीच्या अगोदर तर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावाने तर थेट शिखरच गाठले होते. आता जागतिक पातळीवरील व्यापारविषयक स्थिरता तसेच चीन-अमेरिका, भारत-अमेरिकाय यांच्यातील व्यापारविषयक संबंधात सुधारणा होत असल्याने सोन्याचा भाव चांगलाच घसरतो आहे. आज (24 ऑक्टोबर) सोने थेट 2000 रुपयांनी कमी झाले आहे. आपल्या सार्वकालिक उच्चांकापासून सोन्याचा भाव तब्बल 10000 रुपयांनी कमी झाला आहे.
सध्या सोन्याचा भाव काय?
सध्या सोने आणि चांदीच्या भावात चांगलीच घसरण झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोशिएशनच्या माहितीनुसार 24 ऑक्टोबर रात्री पाच वाजेपर्यंत 24 सोन्याचा भाव 23 ऑक्टोबरच्या तुलनेत 2000 रुपयांनी कमी झाला झाला असून हा भाव 1,21,518 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1700 रुपयांनी कमी होऊन 1,11,310 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 91139 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 71088 रुपये प्रति 10 ग्रॅम पोहोचला आहे.
चांदीचा भाव किती घसरला?
सोन्यासोबतच चांदीचा भावदेखील घसरला आहे. आज (24 ऑक्टोबर) चांदीचा भाव 4400 रुपयांनी घसरला. काल (23 ऑक्टोबर) चांदीचा भाव 1,51,450 रुपये प्रति किलो होता. आता हाच भाव 1,47,033 रुपयांपर्यंत घसरला आहे.
एमसीएक्सवरही सोने-चांदीचा भाव घसरला
MCX वरदेखील सोने, चांदीचा भाव घसरला आहे. 5 डिसेंबरच्या चांदीसाठी आज 2834 रुपयांनी भाव घसरून 145678 रुपयांपर्यंत आला. सोन्याचा भावदेखील 2171 रुपयांनी कमी होऊन 121933 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव आपल्या 132,294 या सार्वकालिक उच्चांवर पोहोचला होता. आता मात्र हाच भाव दहा हजार रुपयांनी कमी झाला आहे. सध्या तर चांदीचा भावदेखील सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत 25000 रुपयांनी कमी झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी सोने आणि चांदीचा भाव आपल्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. धरम्यान, सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशी स्थिती आगामी काळातही राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या




