टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Silver Price : अवघ्या 10 तासात सराफा बाजारात ऐतिहासिक घडामोड… खरेदी करावी की विक्री? चांदीच्या दरात मोठी वाढ, सोनंही चमकलं…

Gold Silver Rate : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबल्यानंतर आता सराफा बाजारात मोठी तेजी पहायला मिळाली. सध्या सोने चांदीत गुंतवणूक करावी की नाही याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबले आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी तेजी पहायला मिळत आहे. अमेरिका, भारतासह ते आशियाई देशांमधील बाजार पेठांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी 3.60% पेक्षा जास्त वाढले. शेअर बाजारातील तेजीबरोबरच सोने आणि चांदीच्या किमतींमध्येही चांगली वाढ झाली.

सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ

आज मल्टी कमोडिटी मार्केट (MCX) मध्ये इंट्राडे दरम्यान सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ दिसली. सोन्याच्या दरात 4000 रुपयांपेक्षा जास्त वाढ होऊन ते 1,54,300 रुपये प्रति तोळा झाली आहे. चांदीच्या दरातही 13,652 रुपयांची वाढ होऊन ती किलोमागे 2,45,000 रुपयांवर पोहोचली. शेअर बाजारातील तेजी आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट असूनही मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या आहेत. यावरून दिसते की गुंतवणूकदार अजूनही सावध आहेत आणि सोनेसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.

गुंतवणूकदारांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

युद्धविराम झाल्यामुळे आगामी काळात भाव आणखी वाढू शकतात. सध्या सोन्याची किंमत 1,53,000 ते 1,55,000 रुपयांच्या दरम्यान आहे. 1,55,000 च्या वर गेल्यास ती 1,58,000 ते 1,60,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर 1,52,000 च्या खाली आल्यास किंमत आणखी घसरू शकते. चांदीची किंमत 2,42,000 ते 2,45,000 रुपयांच्या आसपास आहे. 2,45,000 च्या वर गेल्यास ती 2,50,000 पर्यंत जाऊ शकते, तर 2,40,000 च्या खाली आल्यास घसरण होऊ शकते.

खरेदी करावी की विक्री?

सोने-चांदीच्या खरेदीबाबत बोलताना तज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याऐवजी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सोन्यासाठी हप्त्यांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानले जाते. चांदीची खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण चांदीची अस्थिरता जास्त आहे. वाढत्या किमतींमध्ये घाईघाईने गुंतवणूक करण्यापेक्षा घसरणीच्या काळात खरेदी करणे अधिक योग्य ठरू शकते असं काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकदाच मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा टप्प्यांनी

(टीप – सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असू शकते. आम्ही सोने किंवा चांदीमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही. वरील लेख केवळ माहितीसाठी आहे. )

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

US Iran Ceasefire : हो, आम्ही नाही जिंकू शकलो इराण विरुद्ध हरलो, पहिल्यांदाच अमेरिकेतून मोठी कबुली

Eknath Shinde: एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत; कुणाकुणाला डच्चू देणार, सगळं सांगितलं, नेमकं काय घडलं?

US Iran Ceasefire : पाकिस्तानला कसं वापरलं त्याचा ढळढळीत पुरावा, कॉपी-पेस्ट पोस्टमधून मोठी पोल-खोल, शरीफ तोंडावर पडले

Iran War Live Update: मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!

ट्रम्प यांची डेडलाईन संपण्याआधीच इराणवर हल्ले, अनेक शहरात ब्लॅकआऊट, रेल्वे सेवा उद्धवस्थ

रात्री 8 वाजताची विनाशाची वेळ टळणार? उद्ध्वस्त होण्यासाठी काही तास शिल्लक, थेट घडामोडींना..