पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

आषाढी एकादशीसाठी मानाच्या पालख्यांसह शेकडो दिंड्यांनी पंढरीची वाट धरली आहे. लाडक्या विठुरायाच्या भेटीत वारकरी मजल-दरमजल करत पाऊले टाकत आहेत

1/8
आषाढी एकादशीसाठी मानाच्या पालख्यांसह शेकडो दिंड्यांनी पंढरीची वाट धरली आहे. लाडक्या विठुरायाच्या भेटीत वारकरी मजल-दरमजल करत पाऊले टाकत आहेत.

2/8
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दोन दिवसांपूर्वी आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर पालखीने आज अवघड असा दिवेघाट पार केला. दिवे घाट पार करताना घाटाने जणू हिरवा शालू नेसल्यासारखं दिसत होतं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाट पार करतानाची विहंगम दृश्य विविध कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

3/8
राज्याच्या कोनाकोपऱ्यातून भाविक आणि फोटोग्रार्फर्स आज दिवेघाटात माऊलींच्या पालखीची वाट पाहात होते. पांडुरंग हरी विठ्ठुल श्री ज्ञानदेव तुकाराम... असा जयघोष करत अवघा दिवे घाट आज दुमदुमला होता.

राज्याच्या कोनाकोपऱ्यातून भाविक आणि फोटोग्रार्फर्स आज दिवेघाटात माऊलींच्या पालखीची वाट पाहात होते. पांडुरंग हरी विठ्ठुल श्री ज्ञानदेव तुकाराम… असा जयघोष करत अवघा दिवे घाट आज दुमदुमला होता.
4/8
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आज हजारो वारकऱ्यांची पाऊले दिवे घाटात चालताना पाहायला मिळाली. निसर्ग सौंदर्याने नटलेला, हिरवळीने सुंदर सजलेला दिवे घाट टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमला होता.

5/8
आज 22 जून रोजी पालखी सासवडचा दिवेघाट पार करुन उद्या सासवडला पोहोचेल, 23 जूनचा पालखीचा मुक्काम सासवड येथे असणार असून 24 जून सासवड ते जेजुरी असा पालखीचा प्रवास असणार आहे. जेजुरी नगरीत पालखीवर भंडाऱ्याची उधळण होणार आहे.
6/8
संत तुकाराम महाराजांची पालखी देहुतून तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरीच्या दिशेने निघाल्या असून इतरही मानाच्या पालख्या रवाना झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या पालख्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे.

7/8
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दिवे घाटात दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालखीच्या रथासोबत पाऊले पंढरीची वाट चालत होती.

8/8
मुखी पांडुरंगाचा जयघोष, हाती टाळ, मृदुंग, डोक्यावर तुळस आणि विठ्ठलभक्तीचा आनंद लुटत वारकरी तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. दिवे घाटीतील पालखीची दृश्य मनमोहक आणि डोळे दिपवणारी आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon