टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Financial Deadlines: आला मार्च एंड… 31 मार्चपूर्वी उरका महत्वाची कामे; तुमच्या बँक अकाउंट, टॅक्स अन् बचत योजनांवर होईल परिणाम

Follow Us:
31 March 2026 Financial Deadlines: मार्च एंडिंग आता जवळ आली आहे 31 मार्चपूर्वी टॅक्स आणि फायनान्ससंबंधित कामे पूर्ण केली पाहिजे. वेळेवर असे न केल्यास व्याज आणि दंड आकारला जाऊ शकतो. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याऐवजी 31 मार्चपर्यंत पूर्ण करायच्या कामाची चेकलिस्ट आताच पूर्ण करा.
Income Tax Deadlines 31st March 2026: 31 मार्च 2026 आर्थिक वर्ष 2025-26 चा शेवटचा दिवस आहे. या तारखेपर्यंत काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे बंधनकारक असून ही अंतिम मुदत चुकल्यास तुम्हाला व्याज आणि दंड आकारला जाऊ शकतो.त्यामुळे, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याऐवजी आताच तुमची टॅक्स चेकलिस्ट तयार केली तर फायद्यात राहाल.

आगाऊ कर नक्की तपासा

आगाऊ कर नक्की तपासा

तुम्हाला तुमच्या पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्न मिळत असेल, शेअर बाजार, F&O, फ्रीलान्सिंग, व्याज किंवा भाडे, तर आगाऊ कर भरल्याची खात्री करा. तुम्ही 15 मार्चची अंतिम मुदत चुकवली, तर तुम्ही 31 मार्चपर्यंत पेमेंट करू शकता, पण तुम्हाला त्यावर व्याज आकारले जाऊ शकते.

करबचत गुंतवणूक (80C/80D)
करबचत गुंतवणूक (80C/80D)

तुम्ही जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडला असेल तर कलम 80C (पीपीएफ, ईएलएसएस, एलआयसी) आणि कलम 80D (आरोग्य विमा) अंतर्गत गुंतवणूक करून 1.5 लाख पर्यंत कपात मिळण्यासाठी पात्र ठरण्यासाठी शेवटची संधी तुमच्याकडे आहे. 31 मार्चनंतर केलेल्या गुंतवणुकी यावर्षी कर सवलत मिळणार नाही.

अपडेटेड ITR दाखल करायची अंतिम मुदत

मूल्यांकन वर्ष 2021-22 (आर्थिक वर्ष 2020-21) साठी सुधारित विवरणपत्र म्हणजे ITR-U दाखल करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. यानंतर, आपण या वर्षासाठी कोणतेही सुधारित किंवा अपडेटेड विवरणपत्र दाखल करू शकणार नाही.

31 मार्चपर्यंत टॅक्स हार्वेस्टिंग करायला विसरू नका

31 मार्चपर्यंत टॅक्स हार्वेस्टिंग करायला विसरू नका

तुम्हाला गुंतवणुकीतून कोणतंही नुकसान झालं असेल तर 31 मार्चपासून आधी बुक करा. यामुळे तुम्हाला तुमच्या नफ्यात बदल करून कर कमी करता येईल.

भांडवली नफ्याचे नियोजन करा

भांडवली नफ्याचे नियोजन करा

केवळ नफ्याचे कॅल्क्युलेशन कारणंच पुरेसं नाही, त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शेअर्सवरील 1 लाख पर्यंतच्या दीर्घकालीन नफ्यावर करमाफ आहे, ज्याचा फायदा घेता येऊ शकतो.

लाभांश आणि व्याज उत्पन्नाचा समावेश

बँक एफडी, बचत खाती किंवा लाभांशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश करायला विसरू नका. लोक अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नंतर समस्या निर्माण होऊ शकतात.

फॉर्म 26एएस आणि AIS ची जुळवाजुळव करा

फॉर्म 26एएस आणि एआयएस सोबत जुळवाजुळवा आणि काही विसंगती आढळल्यास त्या त्वरित दुरुस्त करा अन्यथा तुम्हाला आयकर नोटीस पाठवली जाऊ शकते.

पगारदार व्यक्तींनी सादर करायची महत्त्वाची कागदपत्रे

तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या गुंतवणुकीचा पुरावा, घरभाडे भत्त्याच्या पावत्या आणि गृह कर्जाशी संबंधित कागदपत्रे वेळेवर सादर करा नाहीत तुमच्या पगारातून जास्त टीडीएस कापला जाऊ शकतो.

31 मार्चला बँका बंद पण काम नाही थांबणार

31 मार्चला यंदा भगवान महावीर जयंती आहे, त्यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी असली तरीही ऑनलाइन सेवा सुरू राहील. तुम्ही इंटरनेट बँकिंग, UPI किंवा इतर डिजिटल माध्यमांद्वारे कर भरू शकता पण ऐनवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आपली कामे आगाऊ पूर्ण करण्यातच शहाणपणा आहे.

31 मार्च केवळ एक तारीख नाही तर तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही आवश्यक कामे वेळेवर पूर्ण केली, तर तुम्ही केवळ कराची बचतच करू शकत नाही, तर अनावश्यक व्याज आणि दंड देखील टाळू शकता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now