टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

फॅबटेक प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागाचा उत्कृष्ट निकाल

Follow Us:

सांगोला: फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागाचा चालू शैक्षणिक वर्षांतील प्रथम सत्राचा उत्कृष्ट निकाल लागला असल्याची माहिती विभाग प्रमुख प्रा. ज्योती शिंदे यांनी दिली.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागातील प्रथम सत्राचा निकाल नुकताच फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाने जाहीर केला असून यामध्ये १९९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे तर १० पैकी १० एसजीपीए मिळवणारे १९ विद्यार्थी आहेत व ९ ते १० एसजीपीए मिळविणारे एकुण ९० विद्यार्थी आहेत.

फॅबटेक इंजिनिअरिंग महाविद्यालय ऑटोनॉमस (स्वायत्त) दर्जा प्राप्त केलेले महाविद्यालय आहे.प्रथम सत्राच्या परीक्षेत उत्कृष्ट निकाल लावून फॅबटेक महाविद्यालयाने दर्जात्मक शिक्षणाची तसेच उत्कृष्ट निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. ज्योती शिंदे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळबागांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी -चेतनसिंह केदार सावंत 

सांगोला तालुक्यातील आंबा व शेवगा उत्पादकांना नुकसान भरपाई द्या – किरण वाघमोडे यांची मागणी

सांगोल्याच्या नूतन सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते विशेष सत्कार 

धक्कादायक! 10 वी बोर्डाचा उद्याचा पेपर आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद

पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात “ऑपरेशन लोटस” मोहीम यशस्वी 

Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?