टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

इंग्लंडने ताटात दिलं, पण पाऊस करणार पाकिस्तानचा गेम!

Follow Us:

T20 World Cup 2026 Semi Final Scenarios : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये शनिवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणारा सामना केवळ औपचारिक नाही, तर पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई ठरणार आहे

T20 World Cup 2026 Semi Final Scenarios : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये शनिवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणारा सामना केवळ औपचारिक नाही, तर पाकिस्तानसाठी “करो या मरो”ची लढाई ठरणार आहे. श्रीलंकेचा प्रवास जवळपास संपला असला, तरी पाकिस्तानच्या आशा अजूनही जिंवत आहेत. इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्यामुळे समीकरण रंगतदार झाले आहे. आता सगळ्यांच्या नजरा पल्लेकेलेवर खिळल्या आहेत.

पाकिस्तानसमोर मोठं आव्हान

या स्पर्धेत 28 फेब्रुवारीचा दिवस पाकिस्तानसाठी निर्णायक आहे. सध्या न्यूझीलंडकडे 3 गुण आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 1 गुण. जर पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला, तर त्यांचेही 3 गुण होतील आणि मग नेट रन रेटवर निकाल ठरेल.

पण इथेच खरा ट्विस्ट…

पाकिस्तानचा नेट रन रेट खूपच खराब आहे. त्यामुळे त्यांना श्रीलंकेला किमान 64 धावांनी पराभूत करणे किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना 13.1 षटकांत विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी फरकाने जिंकल्यास, विजय मिळूनही पाकिस्तानचे विश्वचषक स्वप्न भंगणार आहे.

पावसाचा डाव रंगला तर?

जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचे गुण 4 होतील आणि पाकिस्तान 2 गुणांवरच थांबेल. म्हणजे कोणतेही गुंतागुंतीचे गणित न करता न्यूझीलंड थेट उपांत्य फेरीत पोहोचेल आणि पाकिस्तानचा प्रवास इथेच संपेल.

पल्लेकेलेचे हवामान काय सांगते? (Weather in Pallekele Today?)

याआधी काही सामने कोलंबोमध्ये पावसामुळे रद्द झाले होते, मात्र हा सामना पल्लेकेले येथे खेळवला जाणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 28 फेब्रुवारीला संध्याकाळी पावसाची कोणतीही शक्यता नाही. म्हणजे सामना निर्विघ्नपणे पार पडण्याची दाट शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rohit Sharma ला मुंबई इंडियन्सकडून नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT…

Ishan Kishan: काव्या मारनचा आश्चर्यचकित करणारा निर्णय; इशानकडे सोपवली SRH संधाची धुरा; कमिन्सला डावलण्यामागचं कारण आलं समोर

Sanju Samson hug KL Rahul : सगळे अवॉर्ड घेण्यासाठी निघाले, अचानक पुढे गेलेला संजू KL राहुलला बघताच माघारी फिरला, सगळ्यांची मनं जिंकली, VIDEO

Kuldeep Yadav-Vanshika Chadha : लाल रंगाचा लेहंगा, दोन पावलं चालली अन्…; कुलदीप यादवची नवरी नखशिखान्त नटली; पाहा लग्नाचे 10 अनसीन फोटो

MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ

IPL 2026 : मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत…; IPL 2026 साठी 10 संघांचा Full Squad