Eknath Shinde: उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांची माहिती आहे.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांची माहिती आहे. जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाही त्यांना डच्चू देणार, असे स्पष्ट आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळेच मागील आठवड्यात पुण्यात शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली गेली. यातून राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आला आहे. ज्यांना मंत्री, आमदार, खासदार, संपर्क प्रमुख, विभाग प्रमुख, महिला आघाडी, जिल्हा आणि शहर प्रमुख तसेच शाखा प्रमुखांच्या कामाचा आढावा देखील स्वतः एकनाथ शिंदे घेऊन त्याचे परीक्षण करणार असल्याने ज्यांना पद आहे, त्यांने पक्ष संघटना वाढीसाठी काम केलेच पाहिजे असेच निर्देश बघायला मिळत आहेत.
फक्त निधीसाठी येणारे दूर केले जातील- एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
आता निवडणुका तीन वर्ष तरी नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व 43 हजार गावांपर्यंत शिवसेना पोचण्यासाठी कामाला लागा असेही आदेश एकनाथ शिंदे यांचे आहेत. सध्या जाहीर करण्यात आलेल्या संपर्क प्रमुख यादीत देखील अनेक आमदार खासदार यांची नावे, त्यांना स्वतःचा मतदार संघ बघून संपर्क प्रमुख असलेल्या जिल्ह्याची आणि लोकसभा मतदार संघाची देखील जबाबदारी बघावी लागणार आहे. त्यांचा कामाचा रिपोर्ट वरिष्ठांना सादर होणार आहे. आता निवडणूक नसल्याने एकनाथ शिंदे यांचे सर्व लक्ष पक्ष संघटना वाढीकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता क्वांटिटी नको, क्वालिटी हवी, फक्त निधीसाठी येणारे दूर केले जातील, जे पक्षाचे काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील असेही संकेत एकनाथ शिंदेंनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. (Maharashtra Politics)

भाजपची काम करण्याची पद्धत कशी आहे तशीच आता शिवसेनेची असणार- (Eknath Shinde Shivsena)
भाजप पक्षाची काम करण्याची पद्धत कशी आहे तशीच आता शिवसेनेची असणार आहे. निवडणुक नाही मात्र मतदार याद्यांवर काम करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक मतदार यादीवर शिवसेना पोचली पाहिजे. प्रत्येक BLA वर आता कामाचा जोर असेल. येणाऱ्या वर्षात मतदारसंघाचे विभाजन होणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्ष तयार असला पाहिजे. म्हणून मतदार याद्यांवर फोकस करा, असे आदेश एकनाथ शिंदेंनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर नाराज- (Eknath Shinde Maharashtra Politics)
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत (Zill Parishad Election 2026) आलेले निकाल पाहता, शिवसेनेतील अकार्यक्षम दोन मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा (Loksabha Election) आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणूकीत (Vidhansabha Election) पक्षातील नेत्यांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. या निवडणुकीत शिंदे पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात प्रचारासाठी गेले. मात्र काही मंत्री आपल्या जिल्ह्यांत तळ ठोकून असतानाही पक्षाच्या जागा आल्या नाहीत. नागपूर अधिवेशनावेळीच शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असताना, जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर पाहता, पक्षात नाराजी नाट्य नकोच म्हणून फेरबदल केले नाहीत. मात्र जिल्हापरिषदेपूर्वी शिंदेंनी मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिले होते.
हेही वाचा
बदलत्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहायचे असेल, तर तुमच्या आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश








