अनेकदा आपण उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवतो. आणि दुसऱ्या दिवशी तोच भात गरम करून खातो. पण असं करणं योग्य आहे का? की असं केल्याने काही विषबाधा होऊ शकते का?चला जाणून घेऊयात.

अनेकदा आपण काही कारणास्तव जास्त जेवण बनवून ठेवतो किंवा काहीवेळेला आपल्याकडून ते बनवलं जातं.मग आपण उरलेलं जेवण फ्रिजमध्ये ठेवतो. जसं की भाजी-भाता असेल तर तो आपण फ्रिजमध्ये ठेवतो. आणि दुसऱ्या दिवशी ते गरम करू न खातो. पण अनेकदा फ्रिजमधून काढल्यानंतर पदार्थ गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. तसेच त्या पदार्थांमधील पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते आणि काही पदार्थ विषारी देखील बनू शकतात.
फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाणे योग्य आहे का?
खास करून भातासंदर्भात असं बोललं जातं की शिळा भात फ्रिजमध्ये ठेवला असेल तर तो पुन्हा गरम करू नये नाहीतर त्यातील पौष्टिक मूल्य कमी होतात. भात शिजवल्यावर 24 तासांनंतर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे तो भात विषारी बनू शकतो. तसेच फ्रिजमध्ये ठेवलेला भात जेव्हा पुन्हा गरम करून खाल्ला जातो तेव्हा त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात परंतु त्याच्यातील विषबाधा होऊ शकतील असे घटक मात्र तसेच राहतात. त्यामुळे भात एकादिवसापेक्षा किंवा एका रात्रीपेक्षा जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवून मग तो गरम करून खात असाल तर आत्ताच थांबा. त्याआधी त्यामुळे होणारे नुकसान लक्षात घ्या.
फ्रिजमधू काढून पुन्हा गरम केलेला भात खाण्याचे तोटे
अन्नातून विषबाधा होऊ शकते
पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. भात थंड झाल्यावर त्यात बॅसिलस सेरियस नावाचे जीवाणू वाढतात. पुन्हा गरम केल्याने जीवाणू नष्ट होतात, परंतु त्याचे जीवाणू भातातच राहतात, ज्यामुळे भात एकप्रकारे विषारी बनतो. जेव्हा हा भात खाल्ला जातो तेव्हा हे विष अन्नातून विषबाधा निर्माण करू शकते.
संबंधित बातम्या
पोटाच्या समस्या
संशोधनानुसार, जर शिजवलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला नाही तर त्यात बॅक्टेरिया लगेच वाढू शकतात. भात पुन्हा गरम केल्यानंतरही हे बॅक्टेरिया त्यात टिकून राहू शकतात. जेव्हा बॅक्टेरिया वेगाने वाढतात तेव्हा ते विषारी पदार्थ तयार करतात आणि पोटाच्या समस्या निर्माण करू शकतात. हे टाळण्यासाठी, भात शिजवल्यानंतर कधीही खोलीच्या तपमानावर जास्त काळ ठेवू नका. भात शिजवल्यानंतर लगेच खाणे चांगले. आणि फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर तो एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवून खाऊ नका.
पचनक्रिया बिघडू शकते
भात पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात, ज्यामुळे ते कमी पचतात आणि पोटदुखी होऊ शकते. ज्यांना पचनाचा जास्त त्रास होतो. त्यांनी कधीही पुन्हा गरम केलेला भात खाऊ नये. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.



