तुम्हाला सुद्धा डोक्यावर चादर घेऊन झोपायची सवय आहे? आत्ताच ही सवय बदला नाहीतर…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Sleep Health: रात्री डोक्यावर चादर घेऊन झोपण्याची सवय आरामदायी वाटली तरी यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

Hypercapnia due to improper sleeping habitsबरेचजण हिवाळ्यात थंडाव्या पासून वाचण्यासाठी रात्री झोपताना एकत्र दोन-तीन चादर किंवा ब्लँकेटचा वापर करतात. तर काहीजण ब्लँकेटने स्वतःला पायापासून डोक्यापर्यंत पूर्णपणे झाकून घेतात. जर तुम्हालाही अशाप्रकारे झोपायची सवय असेल तर आत्ताच सावध व्हा, कारण तुमची ही सवय तुमच्या अस्वस्थ आरोग्याचे मोठे कारण बनू शकते.

एका संशोधनानुसार असे समोर आले आहे की, झोपताना पायापासून डोक्यापर्यंत पूर्णपणे चादर घेतल्यास तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात ताजी हवा आणि ऑक्सिजन मिळत नाही. श्वसन प्रक्रियेदरम्यान शरीरासाठी घातक असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो आणि ऑक्सिजन आत खेचले जाते. पण जेव्हा तुम्ही चादर किंवा ब्लँकेटने तुमचे शरीर पूर्णपणे झाकून घेता तेव्हा कार्बन डायऑक्साइडला बाहेर जाण्यास जागा मिळत नाही. यामुळे श्वास घेताना ऑक्सिजनसह कार्बन डायऑक्साइडही शरीरात खेचला जातो, आणि तुमच्या शरीरातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत जाते. या स्थितीला हायपरकॅप्निया असे म्हटले जाते. यामुळे रक्ताचे पीएच संतुलन बिघडते आणि शरीरातील विविध अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो.

कार्बन डायऑक्साइड वाढल्यामुळे प्रथम श्वासोच्छ्वास जलद होतो, डोके दुखणे, चक्कर येणे, थकवा, गोंधळलेपणाची भावना येणे अशा समस्या उद्भवतात. कारण शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने मेंदूवर ताण येतो. कार्बन डायऑक्साइडची पातळी अधिक वाढल्यास रेस्पिरेटरी अ‍ॅसिडोसिस होऊ शकते, ज्यामुळे रक्त जास्त आम्लीय बनते आणि हृदय, फुफ्फुसेमेंदू यांचे कार्य मंदावते. काही वेळा धडधड वाढणे, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रासही सुरू होतो. गंभीर स्तरावर हायपरकॅप्नियामध्ये बेशुद्धी, फिट्स, रक्तदाब घसरणे आणि जीवघेणी श्वसन समस्या होण्याची शक्यता निर्माण होते. विशेषत: दम्याचे रुग्ण, जास्त धूम्रपान करणारे किंवा ऑक्सिजन थेरपीवर असलेले रुग्ण यांच्यात हे धोके जास्त आढळतात. हायपरकॅप्नियाच्या या लक्षणांना दुर्लक्षित केल्यास श्वसन संस्थेवर आणि हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

थंड हवेपासून वाचण्यासाठी रात्री झोपताना शरीर पूर्णपणे झाकून घेतल्यास ऊब निर्माण होते ज्यामुळे ब्लँकेटमधील तापमान वाढते. सामान्यतः रात्री झोपताना शरीराचे तापमान कमी असणे अनुकूल मानले जाते. त्यामुळे जास्त तापमान वाढल्यास उष्णता जाणवू लागते आणि घाम येऊन अस्वस्थ वाटते. यामुळे झोपेत अडथळा येण्याची शक्यता असते. गाढ झोपेत सतत अडथळा आल्याने शारीरिक तसेच मानसिक समस्या उद्भवतात. झोप पूर्णझाल्याने दिवसभर मेंदूवर जास्त ताण पडून चिडचिड होणे, डोके जड होणे, कामात लक्षलागणे, थकवा यांसारख्या मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.

म्हणूनच जर तुम्हाला सुद्धा झोपताना चादर किंवा ब्लँकेटने शरीर पूर्णपणे झाकून घेण्याची सवय असेल तर आत्ताच ही सवय बदला. झोपताना तुम्हाला ताजी हवा मिळत राहील याची काळजी घ्या. तसेच हायपरकॅप्निया बाबतीतील कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच उपचार सुरू करा. 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon