सांगोला ते तुळजापूर पायी दिंडी सोहळ्याचे 3 जुन रोजी आयोजन

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला(प्रतिनिधी):-सलग 40 वर्षाची परंपरा जोपासत यंदाही सांगोला अंबिका मंदिर ते तुळजापूर तुळजाभवानी माता पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.3 जुन ते शनिवार दि.7 जुन 2025 पर्यंत पायी दिंडी सोहळ्याचा प्रवास असणार आहे.

आई तुळजाभवानी मातेच्या सिंहासन नजीक जाऊन दर्शन घेण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने उपलब्ध होत आहे. यासाठी आज अखेर 90 भाविक भक्तांनी पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केल्याची माहिती मयुरेश गुरव यांनी दिले आहे.

ग्रामदैवत श्री अंबिकादेवी देवस्थान, सांगोला व श्री तुळजाभवानी नवरात्र उत्सव मित्र मंडळ, जुने मंदिर सांगोला यांच्या वतीने मागील 40 वर्षापासून पायी दिंडीचे आयोजन केले जाते. ही परंपरा पुढे सुरू ठेवत यंदाही पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दि.3 जुन रोजी पायी दिंडी ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिरातून मार्गस्थ होणार आहे.े पंढरपूर, यावली, शेळगाव, तुळजापूर असा मुक्काम असणार आहे.

दर्शन अभिषेक नंतर मार्डी येथील माता यमाई देवी चे दर्शन घेऊन सदर पायी दिंडी सांगोला येथे येणार आहे.या दिंडी सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी मयुरेश गुरव 9970911407, दत्तात्रय जाधव-8308399696, सोमनाथ गुरख-9923772255, विवेक पाटील-879647050 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon