ICC World Cup 2025 Indian Womens Team Celebration Photo: महिला विश्वचषक 2025 फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं.

ICC World Cup 2025 Indian Womens Team Celebration Photo
1/13

ICC World Cup 2025 Indian Womens Team Celebration Photo: नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला विश्वचषक 2025 फायनलमध्ये (Womens World Cup Final 2025) भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव (Ind W vs SA W) करून पहिला विश्वविजेता बनला.
2/13

विजेतेपद जिंकल्यानंतर, भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), इतर खेळाडूंप्रमाणे, स्वतःला आवरू शकली नाही.
3/13

विजयानंतर भावनिक झालेल्या हरमनप्रीतने स्मृती मानधनाला मिठी मारली. नंतर, तिने भांगडा नृत्य सादर केले.
4/13

आयसीसी विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाने मैदानात जोरदार सेलिब्रेशन केले.
5/13

सर्व खेळाडूंसह संघाचे सर्व प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांनी मैदानात येत एकमेकांना मिठी मारल्या.
6/13

दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांच्याकडून भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्वचषकाची ट्रॉफी देण्यात आली.
7/13

जय शाह यांच्याकडून ट्रॉफी मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौर नव्या स्टाईलनं अॅक्शन करत ट्रॉफी घेऊन इतर भारतीय खेळाडूंकडे गेली आणि ट्रॉफी उंचावली.
8/13

दरम्यान, महिला विश्वचषक 1973 मध्ये सुरू झाला होता. परंतु भारतीय संघाला कधीही विश्वविजेतेपद मिळवता आले नव्हते.
9/13

पूर्वी, फक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडनेच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
10/13

महिला एकदिवसीय क्रिकेटला शेवटचा नवीन विजेता 2000 मध्ये मिळाला होता, जेव्हा न्यूझीलंडने जेतेपद पटकावले. त्यापूर्वी आणि तेव्हापासून, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विजेते राहिले आहेत.
11/13

अखेर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने यापूर्वी 2005 आणि 2017 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
12/13

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज देखील विश्वचषक जिंकल्यानंतर सेलिब्रेशनात सहभागी झाली. यावेळी खेळाडूंनी मिताली राजच्या हातात विश्वचषकाची ट्रॉफी दिली.
13/13

विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी मैदानातील खेळपट्टीवर भारतीय तिंरगा रोवला.




