आजोबा-आजींसाठी BSNL चा ‘हा’ प्लॅन लॉन्च, लगेच फायदे जाणून घ्या

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

BSNL Samman Plan Price Rs 1812: तुम्ही BSNL चे युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला एका खास प्लॅनची माहिती देणार आहोत. BSNL कंपनीने सन्मान प्लॅन ऑफर सादर केली आहे. ही ऑफर विशेषत: ज्येष्ठ नागरिक युजर्ससाठी सुरू करण्यात आली आहे. आता BSNL च्या या प्लॅनमध्ये नेमकं काय खास मिळत आहे, याची माहिती पुढे जाणून घेऊया.

BSNL Samman Plan Price Rs 1812 : BSNL कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी स्पेशल प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन विशेषत: ज्येष्ठ नागरिक युजर्ससाठी सादर करण्यात आला आहे, ज्यांनी अलीकडेच स्मार्टफोनवर स्विच केले आहे. या प्लॅनमध्ये युजर्संना सिंगल चार्जवर संपूर्ण वर्षाची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांपर्यंत वैधता मिळते. जाणून घेऊया ऑफर्स, प्लॅन आणि बेनिफिट्सशी संबंधित तपशील.

BSNL ने आपल्या अधिकृत एक्स हँडलद्वारे नवीन ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने याला BSNL सन्मान प्लॅन ऑफर असे नाव दिले आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे ही ऑफर विशेषत: ज्येष्ठ नागरिक युजर्ससाठी आणली गेली आहे, ज्यांनी अलीकडेच स्मार्टफोन युजर्स म्हणून बदल केला आहे. या प्लॅनमध्ये लाँग व्हॅलिडिटी आणि वन टू वन टेलिकॉम बेनिफिट्स कमी किंमतीत मिळणार आहेत.

BSNL सन्मान ऑफर

कंपनीने 1812 रुपयांच्या प्लॅनसह BSNL सन्मान ऑफर सादर केली आहे, ज्यासाठी त्यांनी कनेक्टिंग जनरेशन विथ केअर असे नाव दिले आहे. या ऑफरमध्ये युजर्संना 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये रोज 2 GB डेटा दिला जातो. यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच दररोज 100 फ्री SMS पाठवता येतील. या प्लॅनमध्ये BiTV चे सब्सक्रिप्शन मिळते, ज्यामध्ये तुम्हाला 6 महिन्यांपर्यंत सब्सक्रिप्शन मिळते.

ऑफर किती काळ लाइव्ह असेल?

कंपनीने आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या ऑफरची घोषणा केली आहे. ही ऑफर 18 ऑक्टोबरपासून 18 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या रिचार्जअंतर्गत कंपनी युजर्सना मोफत सिम देत आहे. जर तुम्ही खासगी टेलिकॉम युजर्स असाल तर तुम्ही BSNL वर स्विच करण्यासाठी या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

सध्या दिवाळी सुरू असून दिवाळी Bonanza ऑफर कशी मिळवायची? हे देखील पुढे जाणून घ्या.

दिवाळी Bonanza ऑफर कशी मिळवायची?

आपल्या जवळच्या BSNL ग्राहक सेवा केंद्राला (CSC) भेट द्या आणि वैध KYC कागदपत्रे घेऊन जावे लागेल. दिवाळी Bonanza ऑफर्सची विनंती करा (1 रुपये), KYC प्रक्रिया पूर्ण करा आणि विनामूल्य सिम मिळवता येईल. आपल्या फोनमध्ये सिम घाला आणि दिलेल्या सूचनांनुसार ते अ‍ॅक्टिव्ह करू शकता. सिम अ‍ॅक्टिव्ह होताच 30 दिवसांचे विनामूल्य लाभ सुरू होतील, हे महत्त्वाचे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon