टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भाजपची सर्वात मोठी खेळी… या नेत्याला दिलं विधानसभा पोटनिवडणुकीचं तिकीट; विरोधकांचं टेन्शन वाढलं

राहुरीचे मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी मतदार संघाची पोट निवडणूक कोण लढवणार यावरून विविध चर्चा होत्या. सुजय विखे पाटील यांच्याकडून या जागेवर दावा करण्यात आला. शेवटी भारतीय जनता पार्टीने उमेदवाराचे नाव जाहीर केले.

भाजपची सर्वात मोठी खेळी... या नेत्याला दिलं विधानसभा पोटनिवडणुकीचं तिकीट; विरोधकांचं टेन्शन वाढलं

राहुरीचे मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर सर्वांना धक्का बसला होता. अगदी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. आता शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अक्षय शिवाजीराव कर्डिले याला भारतीय जनता पार्टीकडून विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तिकिट देण्यात आले. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील 2026 च्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी अक्षय शिवाजीराव कार्डिले यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र काढण्यात आले. या पोटनिवडणुकीसाठी सुरूवातीपासूनच अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा होती. शेवटी भाजपाने अक्षय कर्डिले यांनाच तिकिट दिले. वडिलांच्या जागी आता अक्षय कर्डिले निवडणूक लढवतील.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी अनेकजण इच्छुक होते. माजी खासदार सुजय विखे पाटील या निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांनी तिकिट मिळवण्याकरिता मोठी कस लावली. या पोट निवडणुकीसाठी आपणच पहिल्या क्रमांकाची पसंती असल्याचे वारंवार सांगताना सुजन विखे पाटील दिसले. त्यामुळे राहुरीच्या पोट निवडणुकीत त्यांच्या भूमिकेविषयी कार्यकर्ते संभ्रमात दिसत असले.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील भगवे वस्त्र धारण केले होते. तिकिट मिळवण्याकरिता त्यांच्याकडूनही प्रयत्न केली जात होती. शेवटी भाजपाने प्राजक्त तनपुरे आणि सुजय विखे यांना बाजूला सारून थेट अक्षय कर्डिले यांनाच तिकिट दिले. जनभावना लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. सुजय विखे पाटील यांनी आपल्याला तिकिट मिळण्याकरिता अनेक प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

शेवटी पक्षाने मोठा निर्णय घेत अक्षय कर्डिले यांच्या नावाची घोषणा केली. राहुरी पोट निवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होत आहे. त्यापूर्वीच अक्षय कर्डिले प्रचाराला लागले आहेत. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अक्षय कर्डिले यांच्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. शिवाजीराव कर्डिले आणि पंकजा मुंडे यांचे काैटुंबिक संबंध राहिले आहेत.

हे सुद्धा वाचा

सांगोला : 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Vijay Shivtare : मृत्यूशी झुंजणाऱ्या विजय शिवतारेंना नवजीवन, डॉक्टर लेकीकडून किडनीदान, मुंबईत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

Sanjay Raut: आदित्य ठाकरेंची मोहित कंबोजांच्या लेकीच्या वाढदिनाला हजेरी, मग आता एकनाथ शिंदेंच्या सुद्धा कार्यक्रमाला जाणार का? संजय राऊत काय काय म्हणाले??

Prashant Padole Accident : महाराष्ट्रात खासदाराच्या कारला ट्रकची जोरदार धडक, एअर बॅगच उघडली नाही, नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण

Maharashtra Weather Alert: ‘धोक्याचा इशारा’! अवकाळी पाऊस, गारपीट आणि Orange Alert; हवामान खात्याचा इशारा

Bigg Boss Marathi 6: रितेश देशमुखचा डबल झटका; टॉपचे 2 स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर

‘हवामानाचा मोठा अलर्ट’! एप्रिलमध्ये मुसळधार पाऊस; गारपीट आणि वादळाचा धोका