टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी ! जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा झाली डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच..

इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबले पाहिजे, अशी मागणी सतत केली जात होती. शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची मागणी ऐकली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध कधी थांबणार यावर थेटपणे मोठे भाष्य केले.

मोठी बातमी! जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा झालीच, इराण अमेरिका युद्ध थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून..

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी अत्यंत आनंदाची बातमी जगासाठी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीवर मोठे विधान केले. यासोबतच त्यांची स्पष्टपणे युद्धबंदी कधी होणार हे सांगितले आहे. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर युद्धाला सुरूवात झाली. युद्धामुळे जग संकटात असून कच्चे तेल आणि गॅसच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. कोणताही देश या युद्धात पुढे येत नव्हता. अमेरिकेने अनेक प्रयत्न केले पण इराण काही हार मानताना दिसत नाही. शेवटी आता अमेरिकेने माघार घेण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेला युद्धाचा थेटपणे फटका बसत आहे. तीन वर्षात गॅसच्या किमती जितक्या वाढल्या नव्हत्या, तेवढ्या या एका महिन्यात अमेरिकेत वाढल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात युद्ध जाताना दिसत आहे. अमेरिकन नागरिकही युद्धाला सपोर्ट करत नाहीत. आखाती देशातील तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्प संकटात आहेत. इराणने काही दिवसांपूर्वीच कतारच्या गॅस प्रकल्पावर मोठा हल्ला केला.

आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. होय तुम्ही अगदी बरोबर ऐकले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्ध कधी संपणार याबद्दल भाष्य करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका दोन ते तीन आठवड्यांत इराणवरील लष्करी हल्ले थांबवेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, वॉशिंग्टन आता इराणसोबतच्या युद्धात सहभागी राहणार नाही.

पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, लष्करी कारवाई आणि राजनैतिक प्रयत्नांच्या माध्यमातून अमेरिका पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराण युद्धातून बाहेर पडू शकते. अमेरिकेचे लष्कर पूर्णपणे इराणच्या बाहेर पडेल. दुसरीकडे 21 युद्धनाैकांनी अमेरिकेने इराणला घेरले आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणसोबत लढणे शक्य नसल्याचे लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प एक पाऊस मागे टाकताना दिसत आहेत.

इराणसोबतच्या युद्धात पहिल्यांदाच युद्ध कधी आणि किती आठवड्यात थांबेल, यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. डोनाल्ड ट्रम्प इतके दिवस फक्त युद्ध थांबवण्याचे संकेत देत होते आणि त्यांनी यावर स्पष्ट भूमिका घेतल्याचे बघायला मिळत आहे. थेट तारीखची डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगून टाकली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच तारखेला डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला एक मोठे गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे. या युद्धाच्या झळा सर्वांनाच बसताना दिसत होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

टोलमध्ये मोठी वाढ

Highways Toll Hike: आजपासून हायवेवरील प्रवास महागला; टोलमध्ये मोठी वाढ, महत्त्वाच्या टोलनाक्यांवरील दराची यादी

Ashok Kharat Case Nashik Sessions Court मोठी बातमी: अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गर्दीतून पोहोचलेला खरात 5 मिनिटात कोर्टरुममधून बाहेर!

रशियाचं लष्करी विमान क्रॅश, 29 जणांचा मृत्यू

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या समोर पुजारी, CA, सराफा व्यावसायिकाला बसवलं; 6 तासाच्या चौकशीत चक्रावणारी माहिती समोर, VIP वऱ्हाडींची यादीही तयार

April 1 Financial Rule Changes: हातातल्या पगारापासून ते आयकर कायदा, पॅन, आधार…, 1 एप्रिलपासून खिसा सांभाळा; नव्या आर्थिक वर्षात लागू झाले 10 बदल

April-2026 मध्ये कोणते स्मार्टफोन्स लॉन्च होणार, Oppo ते Vivo यादीच वाचा