टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी ! ‘पक्ष चालवताना अजितदादांना सहकाऱ्यांनी मदत केली नाही’; NCP विलिनीकरणाच्या चर्चेची टाईमलाईन आणि कारण समोर

Follow Us:

NCP Merger Discussion Timeline : पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या ग्रीन सिग्नलनंतर अजितदादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मुंबई : एकीकडे अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाच्या (NCP Merger) चर्चेचा दावा खोडून काढत असले तरी त्यासंबंधी मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी केंद्रातून पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांनी (Amit Shah) ग्रीन सिग्नल दिला होता अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यानंतरच अजितदांदांनी शरद पवार (Sharad Pawar NCP Group) गटासोबत नोव्हेंबर 2024 पासून चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. त्याचसोबत, पक्ष चालवताना अजित पवारांना त्यांच्या सहकाऱ्यांची फारशी मदत होत नव्हती अशी माहितीही सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकीकडे शरद पवार गटाचे नेते हे अजितदादा विलिनीकरणासाठी आग्रही होते, त्यासाठी चर्चा झाली होती असा दावा करत आहेत. त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मात्र तसं काही नव्हतं असं सांगत आहेत.

NCP Merger Discussion Timeline : पक्ष एकत्र येण्यासंदर्भात कधी केव्हा काय चर्चा झाली?

नागपूर अधिवेशनात नोव्हेंबर 2024 ला विलिनीकरणाच्या चर्चेला सुरूवात झाली.

जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात त्यानंतर अनेक बैठका झाल्या.

देवेंद्र फडणवीस यांना त्यासंबंधी सांगण्यात आले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मला केंद्रीय नेत्यांशी बोलावं लागेल असं सांगितलं.

5 ऑक्टोबर 2025

अजित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून सांगतो असं सांगितलं

14 नोव्हेंबर 2024

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी ग्रीन सिंग्नल आला आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या असा त्यांनी निरोप दिला.

देवेंद्र फडणवीस यांना वरून ग्रीन सिग्नल आला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या आणि पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा करून कळवतो असा निरोप दिला.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला. मात्र, महानगरपालिका निवडणुकीनंतर विलिनीकरणाचं जाहीर करा असं सांगितलं. त्यानंतर 16 जानेवारीला यासंबंधी बैठक झाली.

16 जानेवारी 2026 

अजित पवार, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यात चर्चेसाठी बैठक झाली. या बैठकीत सर्वांनी आपल्या शंका मांडल्या.

16 जानेवारी 2026

प्रेम कोर्टला अजित पवार, सुनिल तटकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यात विलिनीकरणासंबंधी बैठक झाली.

17 जानेवारी 2026

शरद पवार यांना विलिनीकरणासंबंधी सांगण्यात आलं. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका घड्याळावर लढवण्याचा निर्णय झाला. पुणे जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला.

या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर सोपवली होती.

NCP Reason Merger Reason : अजित पवारांना विलिनीकरण का करायचं होतं? 

अजित पवार यांना काका शरद पवार यांना सोडून गेल्याचा डाग पुसायचा होता.

बहिण सुप्रिया सुळे यांच्याशी देखील असलेले नाते कायम ठेवायचे होते.

शरद पवार यांच्या पक्षाला थेट एनडीएसोबत देखील जाता येत होते. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा झटका बसला असता. मात्र, कुटुंब एक झालं नसतं. त्यामुळे दोन्ही बाजुंनी कुटुंब एक होणं गरजेचं होतं.

अजित पवार यांना पक्ष चालवताना सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची फारशी मदत होत नव्हती.

पुणे आणि पिंपरी चिंचवड असो की विधानसभा निवडणूक असो, अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना फार मदत केली नव्हती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य